शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील मोठे प्रकल्प तहानलेलेच!

By admin | Updated: June 30, 2017 00:02 IST

जिल्ह्याचा काही भाग सोडला, तर अजूनही पाऊस सर्वसाधारणच पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.

ओमप्रकाश देवकर । लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : दमदार पावसाची अपेक्षा असतानाही जिल्ह्याचा काही भाग सोडला, तर अजूनही पाऊस सर्वसाधारणच पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत. याच पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिपात पेरणी केली असता काही भागात पिके जोमात असून, या पिकात आंतरमशागतीची कामे सुरु आहेत. जिल्ह्यात पावसाने मृग नक्षत्रात चांगली सुरुवात केली. मात्र, सार्वत्रिक पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी पेरण्या काही दिवसांच्या फरकाने मागेपुढे झाल्या आहेत. मेहकर तालुक्यात सर्वसाधारण पाऊस असला, तरी पिके चांगलीच तग धरुन आहेत. यामध्ये काही शेतकरी तण नियंत्रणासाठी निंदण करीत आहेत, तर काही तणनाशकाची फवारणी करीत आहेत. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी डवरणी सुरु केली आहे. मेहकर तालुक्यात २०१६-१७ मध्ये याच दिवशी १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. २०१७-१८ मध्ये आजपर्यंत २६५ मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसाने खरिपाची पेरणी साध्य झालेली असून, काही ठिकाणी कमी काळात जास्त पाऊस झाल्याने पेरणी उलटली आहे. जास्त पावसामुळे बियाणे उगवलेच नसल्याने काही ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.या पावसाने लघू जलसाठे जरी भरले असले, तरी जिल्ह्यातील मोठे प्रकल्प अजूनही तहानलेलेच आहेत. यामध्ये मोठे प्रकल्प नळगंगा या प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित साठा ६९.३२ दलघमी असून, आजचा पाणीसाठा १३.८२ दलघमी एवढा असून, त्याची टक्केवारी १९.९४ आहे. याचप्रमाणे पेनटाकळी प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित साठा ५९.९७ दलघमी असून, आजचा पाणीसाठा ४.६५ दलघमी एवढा असून, त्याची टक्केवारी ७.७५ टक्के आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचा प्रकल्पीय साठा ९३.४० दलघमी असून, आजचा पाणीसाठा ६.२६ दलघमी एवढा असून, त्याची टक्केवारी ६.७० टक्के आहे. याचप्रमाणे मध्यम प्रकल्प पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी या प्रकल्पातील आजरोजी संचित जलसाठ्याची स्थिती जेमतेम अशीच आहे. जिल्ह्यातील अनेक मोठे प्रकल्प अद्यापही तहानलेले असल्याने संकल्पित प्रमाणानुसार जलसाठे भरण्यासाठी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे.सध्याच्या पावसावर पीक परिस्थिती समाधानकारकजिल्ह्यात पाऊस सर्वत्र समप्रमाणात पडलेला नसला, तरी पिकांना सद्यस्थितीत तग धरुन ठेवण्यासाठी लागणारा पाऊस मात्र जवळपास प्रत्येक तालुक्यात पडलेला आहे. त्यामुळे सध्याच्या पावसावर जिल्ह्यातील पीक परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र, जलसाठे व पुढील पीक वाढीसाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा आहे.