शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो वर्षांपासूनची धार आटली!

By admin | Updated: April 8, 2017 00:19 IST

लोणारच्या धारेला विज्ञानासोबतच धार्मिक महत्त्व

किशोर मापारी - लोणार जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवरातील हजारो वर्षांपासून अखंड वाहत असलेला स्वच्छ व शुद्ध गोड पाण्याचा, रामगया पाण्याचा झरा आटला असून, त्या पाठोपाठ अखंड वाहत असलेली पापहरेश्वर तीर्थ पाण्याची धारही आटली आहे. शासनाचे दुर्लक्ष व परिसरात खोदण्यात येत असलेल्या विंधन विहिरींमुळेच झरे आटले असून, पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. शासकीय विश्राम गृहापासून सरोवरात पायऱ्यांनी खाली उतरल्यानंतर सुरुवातीलाच हेमाडपंथी पश्चिम मुखी रामगया मंदिर दिसते. तीनद्वार असलेल्या या मंदिरात रामाची मूर्ती असून, बाजूलाच श्रीरामेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच रामकुंड बुजलेल्या स्थितीत दिसून येतो. थोडे खाली उतरले की सात वर्र्षांपूर्वी अखंड वाहणारा स्वच्छ व शुद्ध पाण्याचा रामगया नावाने प्रसिद्ध असलेला झरा आटलेला स्थितीत दिसून येतो . जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी येणारे देश-विदेशातील पर्यटक तसेच अनेक शैक्षणिक सहली निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आल्यानंतर याच मार्गाने सरोवर पाहण्यासाठी उतरत होते. एकेकाळी हजारो पर्यटकांची तहान भागवणारा रामगया झरा आज मात्र स्वत:च पाण्याच्या प्रतीक्षेत व्याकुळलेला दिसून येत आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणारे हजारो पर्यटक रामगया मंदिर परिसरात थांबत होते. झऱ्यातील पाणी गोड असल्याने याच ठिकाणी पर्यटक मेजवानी करत आणि विसावा घेत. विद्यार्थीही याच झऱ्यातील पाणी पिऊन तहान भागवत व सहलीचा आनंद घेत. अनेकांची तहान भागवणारा रामगया झराच आटला आहे. रामगया झऱ्याच्या पाठोपाठ गेल्या काही दिवसांपासून पापहरेश्वर धारही आटलेली आहे. देशभरातून अनेक भाविक अस्थी विसर्जन करण्यासाठी येत होते. त्यानंतर याच ठिकाणी अनेक धार्मिक विधी केल्या जात होते. या धारेचेही पाणी गोड होते. अखंड वाहणारे पापहरेश्वर धार तीर्थ आटलेले आहे; पण या बाबतीत प्रशासन मात्र उदासीन भूमिका घेत असून, आजपर्यंत पाण्याचे झरे सुरु कसे होतील, यावर ठोस निर्णय घेतलेले दिसून येत नाहीत.सरोवर परिसरात कूपनलिका घेण्याचे प्रमाण वाढले!४जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर परिसरात बांधकामे तसेच उत्खनन करण्यास बंदी असतानाही अनेक वर्षांपासून बांधकामे सुरूच आहेत. सरोवर परिसरात किमान ५०० ते ७०० फूट कूपनलिका घेतल्या असून, दररोज किमान एकतरी ५०० ते ७०० फूट कूपनलिका सरोवर परिसरात घेतला जातो.