शहरं
Join us  
Trending Stories
1
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
2
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
3
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
4
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
5
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
6
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
7
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
8
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
9
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
10
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
11
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
12
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
13
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
14
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
15
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
16
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
17
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
18
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
19
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
20
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 

शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात हजारो भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन

By विवेक चांदुरकर | Updated: April 17, 2024 16:47 IST

श्री संस्थेद्वारा १३० वा श्रीरामनवमी उत्सव ९ ते १७ एप्रिलपर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार संपन्न झाला.

अनिल उंबरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, शेगाव (विवेक चांदूरकर, खामगाव जि. बुलढाणा): येथील श्री गजानन महाराज संस्थानमधील मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. याठिकाणी रामलल्लासाठी फुलांनी सजवलेला पाळणा दर्शनार्थीचे आकर्षणाचे केंद्र बनला होता. भाविकांनी श्रींच्या समाधी दर्शनानंतर रामलल्लाचे दर्शन घेतले.

श्रीराम नवमीनिमित्त दुपारच्या समयी ह भ प श्रीराम बुवा ठाकूर यांनी किर्तनातून प्रभु श्रीरामाचा महिमा सांगितला. श्रीराम जन्मोत्सवाचे वर्णन कथन करताच ‘श्रीराम जय राम जय जय राम’ चा एकच जयघोष झाला. श्रींच्या मंदिरात सनई, चौघडा, ढोल, नगारा या मंगलवाद्याचा समावेश होता. भाविकांनी श्रीराम मंदिराचे दिशेने फुल पाकळ्याची उधळण करत श्रीराम जय राम जय जय राम, गण गण गणात बोते, जय गजानन, श्री गजानन, जय श्रीराम, जय जय श्रीराम चा जयघोष केला.श्री संस्थेद्वारा १३० वा श्रीरामनवमी उत्सव ९ ते १७ एप्रिलपर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार संपन्न झाला.

या उत्सवात दरारोज सकाळी ६.०० ते ६.४५ काकडा. ७.१५ ते ९.१५ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.१५ ते ६.०० हरिपाठ व रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन संपन्न झाले. सप्ताहात ह.भ.प.अनंत बिडवे, बार्शी, ह.भ.प. राजेंद्र आंबेकर, केकतनिंभोरा, ह.भ.प. बळीराम दौड, अकोला, ह.भ.प. अनिरूद्ध क्षिरसागर, सावरगांव माळ, ह.भ.प. गणेश हुंबाड, महागांव, ह.भ.प. अमोल कासलीकर, कासली, ह.भ.प. विठ्ठल राठोड, ह.भ.प. रामभाऊ उन्हाळे, शेगांव, ह.भ.प. श्रीहरी वैष्णव, जालना व ह.भ.प. श्रीराम ठाकूर, परभणी यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले. तसेच श्री अध्यात्म रामायण स्वाहाकारास चैत्र शु. ५ ला प्रारंभ होवून चैत्र शु. ९ ला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहूती झाली. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाचे श्रीहरी कीर्तन होवून नामस्मरणाचे जयजयकारात, टाळ, मृदंग, नगारा व मंगलवाद्याचे गजरात श्रीरामजन्मोत्सव संपन्न झाला.

सर्व शाखांमध्ये रामनवमी उत्सव

उत्सवकाळात शेगांवसह, शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरीवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर रामनवमी उत्सव संपन्न होऊन १,५०,००० चे वर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :Ram Navamiराम नवमीShegaonशेगावGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर