बुलडाणा : बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खामगाव वळणमार्गावर सपळा रचून अवैध देशीदारुसह ५0 हजारचा माल जप्त केला. ही कारवाई १0 जुलै रोजी सायंकाळी करण्यात आली. यात दिपक श्रीकृष्ण गोमासी (३२) रा.हिरानगर, खामगाव याला अटक करुन त्याच्याकडून देशीविदेशी दारुच्या ५ हजार बॉटल तसेच मोटरसायकल असा माल जप्त केला. या कारवाईत पोलिस उपनिरिक्षक निलेश लोधी, प्रकाश राठोड, राजु ठाकूर, दिपक पवार, विजय दराडे, अविनाश जाधव आदी सहभागी झाले होते.
अवैध दारुसह हजारोचा माल जप्त
By admin | Updated: July 12, 2014 00:15 IST