ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक तत्काळ जाहीर करण्यात यावे. १ नोव्हेंबर २००५ पासून नोकरीत लागलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अधिनियम १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. तसेच यूजीसीच्या आदेशानुसार संवर्ग आरक्षण कायदा २०१९ लागू करून महाविद्यालय व विद्यापीठ एकच मानून रखडलेली प्राध्यापक भरती सुरू करण्यात यावी. राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी यांना याबाबतीत १२ ऑगस्ट रोजी निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, सुस्त सरकारला जाग न आल्याने गोरसेनेने साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. या अगोदर २३ जुलै रोजी महाराष्ट्र राज्यातील २६७ प्रशासकीय ठिकाणी एकाच दिवशी एकाच मागणीसाठी गोरसेनेनेच्यावतीने निवेदन देऊन संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. आजही संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर गोरसेनेचे कार्यकर्ते साखळी उपोषणाला बसलेले आहेत. त्याअनुषंगाने बुलडाणा जिल्ह्याच्या उपोषणाकरिता हजारो गोर सैनिक तथा कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वितेश चव्हाण यांनी केले आहे.
गोर सेनेच्या साखळी उपोषणाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा : वितेश चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST