खामगाव : गत काही दिवसांमध्ये राज्यात विविध भागांमध्ये दोन हजारांपेक्षा जास्त जनावरे मृत्यूमुखी पडली. चारा टंचाई, पाण्याची समस्या आणि वातावरणातील बदलाचा परिणाम होवून जनावरांना अशक्तपणा आला आणि त्यामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस उशिरा सुरु झाला. त्यामुळे बर्याच भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाचे हे बिघडलेले चक्र जनावरांसाठी घातक ठरत आहेत. वातावरणात होणारे बदल हे जनावरांना न पेलवणारे आहेत. त्यांना नेमका कोणता आजार झाला, याचे निदान झाले नाही. काही भागांमध्ये जनावरांना मुबलक चारा मिळाला नाही, म्हणून दगावली. काही भागात चारा असूनही वातावरणातील बदल सहन न झाल्याने जनावरांमध्ये अशक्तपणा येवून ती मरण पावल्याचे वैद्यकिय अहवालात म्हटले आहे. गत दोन, तीन आठवड्यांमध्ये काही भागात जोरदार पाऊस झाला. सलग तीन-चार दिवस पाऊस सुरु असल्यानेही जनावरांची देखभाल करता आली नाही. त्यामुळे जनावरे मरण पावली. जनावरांवर अशा प्रकारचे नैसर्गिक संकट आल्याने ते रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होत आहेत. जनावरांना लसी देण्याचे काम मोठय़ा प्रमाणात होत आहे. राज्यात मरण पावलेल्या जनावरांचा सर्वे करुन निकषाप्रमाणे मदत दिली जाणार असल्याची माहीती मदत व पुनर्वसन विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.
हजारो जनावरांचा मृत्यू
By admin | Updated: August 11, 2014 00:14 IST