शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

कोरोनाचे ३० टक्के मृत्यू दुर्धर आजारामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:18 IST

जिल्हास्तरीय कोरोना डेथ ऑडिट समितीने यासंदर्भात निष्कर्ष काढला आहे. दरम्यान, या व्यतिरिक्त ज्या बाधित व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत ते ...

जिल्हास्तरीय कोरोना डेथ ऑडिट समितीने यासंदर्भात निष्कर्ष काढला आहे. दरम्यान, या व्यतिरिक्त ज्या बाधित व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत ते मोठ्या प्रमाणावरील निमोनिया झाल्याचे स्पष्ट होत आहे, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले; मात्र त्यासंदर्भातील अंतिम अहवाल अद्याप तयार करण्यात आला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुर्धर आजारामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, ह्रदयरोग, किडनीच्या आजारांचा समावेश आहे. २६ डिसेंबर रोजी डेथ ऑडिट समितीची बैठक झाली असून, त्यात आनुषंगिक अहवाल अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रामुख्याने या दुर्धर आजारांसोबतच ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे अशा कोरोना बाधितांपैकीही काही जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत्युदर १.२० टक्के

जिल्ह्याचा मृत्युदर हा सध्या १.२० टक्क्यांवर स्थिर आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९६.२५ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर एकूण बाधित रुग्णांची संख्या पाहता सक्रिय रुग्णांचे प्रमाण जिल्ह्यात अवघे २.५४ टक्क्यांवर आले आहे. परिणामी, पॉझिटिव्हिटी रेटही कमी आहे.

कोट

जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी ४५ मृत्यू हे दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींचे झाले आहेत. डेथ ऑडिट समिती नियमित स्वरूपात आठवड्याला आणि १५ दिवसांआड याचा सविस्तर आढावा घेत असून, आनुषंगिक उपाययोजना करत असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

वृद्धांची काळजी आवश्यक

६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांची कुटुंबीयांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अकारण बाहेर न पडता, मास्क वापरणे, नियमित हात स्वच्छ धुणे व वेळेत अैाषधोपचार करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.