शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षीच्या तुलनेत दीडपट पाऊस

By admin | Updated: July 8, 2017 01:07 IST

पावसाचे दिवस कमी; मात्र प्रमाण जास्त

खामगाव: परिसरात मागील वर्षी ७ जुलैपर्यंत झालेल्या पावसाच्या तुलनेत यावर्षी दीडपटीहून अधिक जास्त पाऊस पडला आहे. वास्तविक पावसाचे दिवस कमी आहेत; मात्र प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.७ जून रोजी पावसाळा सुरू होत असल्याचे मानले जाते; मात्र बुलडाणा जिल्ह्यात साधारणत: १५ जूनपासून पावसाला सुरुवात होते. यावर्षी जूनच्या अगदी सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. थोडा-थोडका नव्हे तर चांगला धो-धो पाऊस पडला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी घाई-घाईत शेतमशागतीची कामे उरकून पेरण्याही करून टाकल्या. यानंतर मात्र बरेच दिवस पावसाने दडी मारली. पुढे जून महिना संपेपर्यंत पाऊस जवळपास गायबच राहिला. जुलैमध्ये त्याचे पुनरागमन झाले; मात्र तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या होत्या. त्यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे. तर काही जणांच्या पेरण्या अद्याप खोळंबलेल्या आहेत. ७ जुलैपर्यंत एकूण पडलेल्या पावसाचे प्रमाण लक्षात घेतले तर गतवर्षीच्या तुलनेत दीडपटीहून अधिक पाऊस झालेला आहे. त्यामुळे जमिनीतील ओल टिकत नसल्याने शेतकऱ्यांची पेरणीची हिंमत होत नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप खोळंबलेल्या आहेत.तर अगोदरच पेरणी केलेल्या काही शेतकऱ्यांच्या पेरण्या साधल्या असून, त्यांच्या पिकांची स्थिती चांगली दिसत आहे. त्यामुळे खामगाव परिसरातील पीक परिस्थितीत असमानता दिसून येते.असे आहे पर्जन्यमानमागील वर्षी ७ जुलैपर्यंत फक्त १०९.८ मिमी अर्थात ४.३ इंच पाऊस पडला होता. तर यावर्षी ७ जुलैपर्यंत १८०.२ मिमी अर्थात ७ इंच पाऊस पडला आहे. यावरून यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत दीडपटीहून अधिक पाऊस झाल्याचे दिसून येते. वास्तविक यावर्षी पावसाचे दिवस कमी असूनही प्रमाण जास्त आहे. कमी दिवसात जास्त पाऊस झाला असून, उन्हही प्रचंड तापत आहे.