शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाटमारी करून एका दुचाकीस्वारास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:38 IST

फिर्यादी किशोर अंबादास खरात (२४, रा.नांदखेडा) हे जाफराबादवरून दुचाकीने घरी जात असताना अनोळखी पाच जणांनी त्यांची दुचाकी जाफराबाद रोडवरील ...

फिर्यादी किशोर अंबादास खरात (२४, रा.नांदखेडा) हे जाफराबादवरून दुचाकीने घरी जात असताना अनोळखी पाच जणांनी त्यांची दुचाकी जाफराबाद रोडवरील प्रवासी निवाऱ्याजवळ अडवून हत्याराने जखमी केले. त्यांच्या खिशातील मोबाइल व नगदी आठ हजार रुपये असा एकूण अकरा हजार रुपयांचा ऐवज सायंकाळी पळवून नेला. याबाबत पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.

८० हजारांची घरफोडी

तालुक्यातील ग्राम गारगुंडी येथील रंगनाथ भाऊराव काकड यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट व लोखंडी संदूक यामधील एकदाणी (किं. २५ हजार),गहू मन्याची पोत (किं. ३० हजार) तसेच लहान मुलांच्या कानातील बाळी (किं. ७ हजार) आणि रोख रक्कम १५ हजार रुपये असा एकूण ८० हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी फिर्यादी रंगनाथ भाऊराव काकड यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी १९ सप्टेंबरला विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींच्या शोधार्थ अतिरिक्त पथक गठीत

देऊळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या दोन्ही घटना या १८ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अतिरिक्त पथकांची नेमणूक करून आरोपीच्या शोधामध्ये पाठवले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी दिली आहे.