शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयात वरिष्ठांशी केलेला वाद भोवणार

By admin | Updated: November 16, 2014 00:01 IST

खामगाव नगरपालिकेच्या ‘त्या’ कर्मचा-यावर होणार शिस्तभंगाची कारवाई.

खामगाव(बुलडाणा) : नगरपालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यामध्ये काल शुक्रवारी झालेला वाद आता थेट मुख्याधिकार्‍यांपर्यंंंत पोहोचला आहे. या प्रकरणामध्ये नगरपालिका कर्मचारी आणि अ.भा. सफाई मजदूर काँग्रेसने उडी घे तल्याने संबंधित कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.नगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक आणि वॉर्ड चपराशी यांच्यामध्ये शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता हमरी-तुमरी झाली होती. त्यापूर्वी नगराध्यक्षांच्या दालनात नगराध्यक्षांच्या उपस्थितीत दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. मात्र, काहींच्या मध्यस्तीमुळे प्रकरण निवळले होते. परंतु, नगराध्यक्ष निघून गेल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद उफाळून आला. यावेळी वॉर्ड चपराशी खेडकर यांनी आरोग्य निरीक्षक निळे यांच्याशी वाद घालत, हमरी-तुमरी केली. प्रकरण हाणामारीपर्यंंंत पोहोचले. परंतु, काही कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखत दोघांनाही शांत केले. दरम्यान, या प्रकरणी आज शनिवारी नगरपालिका कर्मचारी संघटनेने मुख्याधिकार्‍यांशी चर्चा करून वॉर्ड चपराशाची अरेरावी संपुष्टात आणण्यासाठी कारवाईची मागणी लावून धरली. त्याचप्रमाणे अ.भा. सफाई मजदूर काँग्रेसनेही शहर अध्यक्ष सुनील उजैनवाल यांच्या नेतृत्वात मु ख्याधिकार्‍यांना वॉर्ड चपराशी खेडकर यांच्यावर कारवाईसाठी पत्र सादर केल्याची माहिती आहे.