शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कृउबासच्या कोणत्याही संचालकाचे पद धोक्यात नाही !

By admin | Updated: October 17, 2016 02:31 IST

खामगाव बाजार समिती सभापती संतोष टाले यांचा दावा.

खामगाव, दि. १६- बाजार समिती सभापती, उपसभापती आणि संचालकांचे पद धोक्यात असल्याबाबत चर्चा होत आहे. मात्र सेवा सहकारी सोसायटी बरखास्तीला न्यायालयात आव्हान देण्यात आले असल्याने कोणत्याही संचालकाचे पद धोक्यात नसल्याचा दावा कृउबास सभापती संतोष टाले यांनी प्रसिध्दी पत्रकातून केला आहे.महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने कृउबास निवडणुकीत सर्व शक्तीनिशी शथीर्चे प्रयत्न केले. परंतू त्यांना यश आले नाही. त्यामुळे सत्तेचा दुरूपयोग करून सोसायट्या बरखास्त करणे, त्या माध्यमातून गैर कायदेशीर गुंता करून संचालकांना त्रास देणे, असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढीस लागले आहेत. जिल्हा उपनिबंधक आणि तत्सम अधिकार्‍यांनी काही कृउबासमध्ये या धर्तीवर राजकीय दबावाखाली काही संचालकांना कायम, तर काही संचालकांना अपात्र ठरविले. निबंधकांनी विरोधाभासी निर्णय दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तथापि, आजपयर्ंत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालकांना अपात्र ठरविण्यासाठी तक्रार अर्ज दाखल नाही. सेवा सहकारी सोसायटीची मुदत संपल्याने तालुक्यातील काही सोसायट्यांवर नियमबाह्य पध्दतीने प्रशासक नेमले आहेत. या प्रशासक नेमणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १३ ऑक्टोबर २0१६ रोजी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेचा क्रमांक डब्ल्यू पी.नं. ५९४९/१६, ५९५0/१६, ५९५१/१६ असा असून, सदर याचिकेवर न्यायालयाने अंतरिम स्थगनादेश दिला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, राजकीय दबावातून सुरू असलेल्या छळाबाबत आपणाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्‍वासही पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.