शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कांदा विक्रीची पावती नसल्याने शेतकरी राहणार मदतीपासून वंचित

By admin | Updated: September 2, 2016 02:23 IST

बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांकडे विक्री पावत्याच नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहणार.

गिरीश राऊत खामगाव (जि. बुलडाणा), दि. १: कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल १00 रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा व मलकापूर तालुका वगळता इतर ११ तालुक्यांत करण्यात आलेल्या कांदा विक्रीबाबत कोणत्याही विक्री पावत्या शेतकर्‍यांकडे नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकरी शासनाच्या या मदतीपासून वंचित राहणार आहेत. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल १00 रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार जुलै व ऑगस्टमध्ये कृउबासमध्ये कांद्याची विक्री केलेल्या शेतकर्‍यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. एका शेतकर्‍यास जास्तीत जास्त २00 क्विंटलपर्यंत अनुदान मिळणार असून, मुंबई बाजार समिती वगळता राज्यातील इतर सर्व बाजार समित्यांसाठी हे अनुदान लागू राहणार आहे. हे अनुदान मिळण्यासाठी कांदा उत्पादक शेतकर्‍यांना सातबाराचा उतारा, बँक बचत खाते क्रमांकासोबतच कांदा विक्रीपट्टी आदी तपशिलासह संबंधित बाजार समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र शासनाने अनुदान जाहीर केले असले, तरी या निर्णयानुसार बुलडाणा जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यात केवळ नांदुरा व मलकापूर तालुक्यातच कृउबासमध्ये कांद्याची खरेदी-विक्री केली जाते. इतर ११ तालुक्यात मात्र कृउबासमध्ये कांद्याची खरेदी होत नसल्याने शेतकरी कृउबासमध्ये कांदा विक्रीसाठी आणत नाहीत. कांद्याला मिळणारा अत्यल्प असा २ ते ३ रुपये प्रतिकिलोचा भाव पाहता वाहतुकीचा खर्चसुद्धा तोट्यात टाकणारा असल्याने तसेच लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकर्‍यांनी शेतातच कांदा ठेवला होता. मात्र अपेक्षेप्रमाणे साठवणूक केल्यानंतरसुद्धा कांद्याचे भाव न वाढल्याने तसेच कांदा निसणीवर होणारा खर्च व सडून कांद्याचे होणारे नुकसान पाहता शेतकर्‍यांनी शेतातूनच कांदा विकण्यास पसंती दिली. तर व्यापार्‍यांनीही शेतकर्‍यांची ही अडचण पाहता अडवणूक करीत मातीमोल भावाने शेतातूनच शेतकर्‍यांच्या कांद्याचे मोजमाप करुन खरेदी केली. अखेर उशिरा का होईना शासनाने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल १00 रुपयेप्रमाणे २00 क्विंटल र्मयादेपर्यंत अनुदान जाहीर केले. मात्र या अनुदानाच्या निकषात विक्रीचिठ्ठी मागितल्याने हजारो कांदा उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. तेव्हा शासनाने विक्रीचिठ्ठी आवश्यक न करता अटींमध्ये शिथिलता दिली, तरच कांदा उत्पादक शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने मदत व न्याय मिळू शकेल.