शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

पर्यटन विकासासाठी नियोजन नाही

By admin | Updated: September 2, 2015 02:26 IST

पर्यटन विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे नियोजन समितीने पुढाकार घेण्याची मागणी.

हर्षनंदन वाघ / बुलडाणा : जिल्ह्याला निसर्गरम्य वारसासह ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या मोठी परंपरा आहे; मात्र पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील अनेक स्थळे दुर्लक्षित आहेत. पर्यटनाच्या नकाशावर शेगाव, लोणार व सिंदखेडराजा या तीन प्रमुख शहरांच्या विकासासाठी घोषित आराखडे वादातच अडकले आहेत. या स्थळांव्यतिरिक्तही इतर पर्यटनस्थळे दुर्लक्षित असून, पर्यटन नियोजन आराखडा होणे गरजेचे आहे.बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तरेला गाविलगडचा डोंगर असून, तो सातपुडा पर्वताचा भाग आहे. दक्षिण भागात अजिंठा डोंगर आहे. निसर्गाने बुलडाणा जिल्ह्यात आपले सौंदर्य मुक्तहस्ते उधळले असले तरी या सौंदर्याचे सोने करण्याची क्षमता असलेले धोरण कागदावरच आहे.शेगावमध्ये संत गजानन महाराज यांचे भव्य असे मंदिर आहे. येथील आनंद सागर या प्रकल्पामुळे तर या शहराची ओळख देशविदेशात पोहोचली आहे. याठिकाणी दर्शनाच्याच एकमेव हेतूने नव्हे, तर पर्यटक म्हणून येणार्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या शहराच्या विकासासाठी राज्य शासनाने शेगाव शहर विकास आराखडा मंजूर केला होता; मात्र सहा वर्षे उलटले तरी कामे पूर्णत्वास गेलेली नाही. जगप्रसिद्ध लोणार ठिकाण देशी-विदेशी अभ्यासकांसह पर्यटकांचे नेहमी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. याठिकाणी असलेल्या विविध मंदिरांमुळे येथे पर्यटकांबरोबरच भाविकांची संख्या लक्षणीय आहे. या सरोवराचे संवर्धन व संरक्षणासाठी विकास आराखडा दहा वर्षांपूर्वी २२५ कोटींचा मंजूर करण्यात आला होता; मात्र केवळ १0 कोटींचा निधी विकासकामांसाठी दिला. त्यापैकी केवळ साडेपाच कोटीच खर्च झाले असून, झालेली कामेही निकृष्ट दर्जाची आहेत. १४00 प्रस्तावित पहिल्या टप्प्यातील घरकुलांपैकी फक्त ३५0 घरकुले पूर्ण झाली असून, पाण्याची वितरण व्यवस्था अपूर्ण आहे.मेहकरचा बालाजी तसेच तालुक्यातील साखरखेर्डा हे गावही महत्त्वाचे आहेत. मढ गावाच्या पुढे गेल्यास बुधनेश्‍वराचे पीठ मानल्या गेलेल्या या ठिकाणापासून पैनगंगेचा उगम झाला. या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर जाळीचा देव हे महानुभाव पंथीयांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थळ आहे. येथे चक्रधर स्वामींचे मंदिर आहे. बुलडाणा शहरापासून काही अंतरावर स्वयंप्रकाश महाराज यांचे गिरडा पर्यटन केंद्र आहे; तसेच मलकापूर रस्त्यावरील राजूर घाटाच्या माथ्यावर प्रती तिरूपतीचे व्यंकटगिरी बालाजीचे मंदिर आहे, असा अनेक संपन्न वारसा लाभलेला असतानाही पर्यटन विकासाला केंद्र मानून विकासाचे नियोजन झालेले नाही. त्यामुळे पर्यटनासह रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे जिल्ह्याचा विकास खोळंबला आहे.