शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कृती आराखडयासाठी शिवारफेऱ्यांचे नियोजनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:23 IST

MNREGA News शिवारफेऱ्यांचे नियोजन पंचायत समित्यांमध्ये झाले नसल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत २०२१-२२ च्या मजूर अंदाजपत्रक व कृती आराखडयासाठी शिवारफेरीतून नियोजन केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी शिवारफेऱ्यांचे नियोजन पंचायत समित्यांमध्ये झाले नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, २०२० - २१ चा पूरक आराखडाही तयार करण्याचे निर्देश असून वैयक्तिक लाभाच्या कामासोबत जलसंधारणाच्या कामांची निवड होणार आहे. त्या कामांवर ६५ टक्के खर्च करण्याचेही नियोजन करण्याचे बजावण्यात आले. अंदाजपत्रक व कृती आराखडयासाठी शिवारफेरी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. यासाठी गावातील सरपंच, ग्रामपंचायतींचे प्रशासक, ग्रामसेवक, रोजगार सेवक, कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामपंचायत स्तरावरील अन्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही शिवारफेरी होणार आहे. शिवारफेरीदरम्यान कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. तसेच या शिवारफेरीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्तीही होणार आहे.  त्यांना ग्रामपंचायतीचे नरेगा क्षेत्रीय नियोजन अधिकारी म्हणून काम करावे लागणार आहे. या शिवारफेरीत गावक ऱ्यांना मार्गदर्शन, गावाची पार्श्वभूमी तयार करणे, गावातील कमीतकमी १० प्रतिनिधींची निवड करणे, गावांचा आराखडा तयार करणे, गावातील महिला, भूमीहीन, शेतमजूर यांच्यासाठीही आराखडा तयार करणे, निवड केलेल्या स्वयंसेवकांची फळी तयार करणे, निवड केलेली गावे कोणत्या योजनेत समाविष्ट आहेत, याची माहिती घेणे, पाण्याचा ताळेबंद तयार करून पिकांचे नियोजन करणे यासह विविध कामे करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने शिवार फेऱ्यांचे योग्य पद्धतीने नियोजन होणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा