शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह नेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात एकही शववाहिका नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 11:51 IST

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यात एकही शववाहिका नसल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाच्या काळात मृतदेह नेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात एकही शववाहिका नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सध्याची आपत्कालीन परिस्थिती पाहता बुलडाणा जिल्ह्यात शासकीय तथा खागी रुग्णवाहिका तथा शववाहिका किती आहेत, याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मागविण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयाने एक पत्रच उपप्रादेशिक परिवहन विभागास दिले असून, राज्यातील अन्य जिल्ह्यातूनही अशी माहिती मागविण्यात येत असून, मुंबई येथील आरोग्य विभागास ही माहिती सादर करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात एकाच रुग्णवाहिकेत जवळपास २२ पार्थिव नेण्यात आल्याचा कथित प्रकार समोर आला होता. त्या पार्श्वभूमीवर तर ही माहिती संकलित केली जात नाही ना, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याबाबत सूत्रांकडून स्पष्टता मिळालेली नाही. कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांना वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यासोबतच त्यांनी ने-आण करताना त्यांना योग्य सुविधा रुग्णवाहिकेत उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे  असावा, असाही कयास व्यक्त केला जात आहे. सोबतच आरोग्य क्षेत्रातील रुग्णवाहिकांची संख्या वाढवून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचा यामागे उद्देश असावा, असाही कयास सूत्रांनी व्यक्त केला.

मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापरजिल्ह्यात शववाहिका नसल्याने मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत असून, तीन रुग्णवाहिका कंत्राटी स्तरावर त्यासाठी लावण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल