शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर येथे एकाच रात्री पाच ठिकाणी चो-या

By admin | Updated: December 15, 2014 23:45 IST

शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण; श्‍वान पथक हतबल.

मेहकर (बुलडाणा): शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, १४ डिसेंबरच्या एकाच रात्री ५ ठिकाणी चोर्‍या झाल्याची घटना घडली. त्यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, शहरातील शेळके कॉलनीत राहणार्‍या पं.स. कर्मचारी सुनिता संजय काळुसे या नाशिक येथे मुलाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील व घरातील साहित्याची फेकाफेक केली. याच घरापासून काही अंतरावर जाफ्राबाद येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राम गायकवाड यांच्या घराचाही दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न झाला; तसेच शिक्षक कॉलनीतील मणिराम गुळवे, शिक्षक दिवठाणे यांचेही घर अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे. त्यानंतर लाईनमन मंगवडे यांच्या घराचा कोंडा तोडत असताना झालेल्या आवाजामुळे घरातील मंडळी जागी झाली. त्यामुळे चोरट्यांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. एकाच रात्री पाच ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावर श्‍वान पथक पाचारण केले होते; मात्र काहीच फायदा झाला नाही. अद्याप एकूण झालेल्या चोरीचा आकडा समजू शकला नसून, पुढील तपास सुरु आहे. याप्रकरणी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.