शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला येथून धान्य उचलीचा तिढा सुटता सुटेना!

By अनिल गवई | Updated: March 6, 2024 20:29 IST

बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागाकडून आता अवर सचिवांकडे तक्रार.

खामगाव: अकोला येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या (सीडब्ल्यूसी गोदाम ) क्रमांक १ आणि २ येथून धान्य उचल पूर्ण क्षमतेने दिली जात नसल्याने मेटाकुटीस आलेल्या जिल्हा पुरवठा विभागाने अखेर अन्न व नागरी पुरवठा विभागाचा दरवाजा ठोठावला आहे.  वारंवार पत्रव्यवहार करूनही केंद्रीय वखार महामंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्याने, बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागाने आता याबाबत अवर सचिवांकडे तक्रारी केली आहे. त्यामुळे अकोला येथील केंद्रीय वखार महामंडळ आणि बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागात चांगलीच जंुपली असल्याचे चित्र आहे.

प्राप्त माहितीनुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांच्या गहू व तांदळाची उचल अकोला येथील वखार महामंडळाच्या दोन गोदामातून सुरू आहे. मात्र, या गोदामातून धान्याच्या उचलीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. परिणामी, बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक व वितरण प्रणाली संकटात सापडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.  िजल्हा पुरवठा विभागाकडून भारतीय वखार महामंडळाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही अधिकाअधिक वाहने भरून उचल देण्यासाठी दुर्लक्ष केल्या जात असल्याचा अारोपही पत्रात करण्यात आला आहे. अकोला येथील गोदामातून वारंवार धान्य उचलीबाबत समस्या निर्माण होत असल्याने पर्यायी गोदामातून धान्याची उचल करण्यासाठी प्रयत्न करण्याचीही मागणी आता जोर धरू लागली आहे.  हजारो मेट्रीक टन धान्याची उचल प्रलंबितबुलढाणा जिल्ह्याची मार्च २०२४ या महिन्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या गहू व तांदळाच्या नियतनाची उचल सुरू असून दहा हजार मे.टन नियतनापैकी तब्बल  सातहजारापेक्षा अधिक मे. टन धान्याची उचल प्रलंबित असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच एप्रिल  महिन्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे गहू व तांदळाचे संपूर्ण दहा हजारपेक्षा अधिक मेट्रीक टन नियतनाची उचल प्रलंबित  धान्य व्यपगत होण्याची भीती.आगामी सणासुदीच्या दिवसांत पुरेशा प्रमाणात गहू, तांदळाची उचल मिळत नसल्याने धान्य व्यपगत होण्याची भीती जिल्हा पुरवठा विभागाने वर्तविली आहे. तसेच लाभार्थी धान्यापासून वंचित राहण्याची शक्यताही वर्तविल्याचे समजते. या तांत्रिक अडचणींमुळे सुटीच्या दिवशीही उचल देण्यासाठी पुरवठा विभागाने पत्र दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा