डोणगाव (जि. बुलडाणा): डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये रायटर रुममध्ये ठाणेदार विशाल पाटील यांचे रायटर दीपानंद पानगोळे व पोहेकाँ संजय मुळे यांच्यावर ११ एप्रिलला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पो.नि.एस.बी.भाईक यांनी दीपानंद पानगोळे यास ५ हजार रुपये लाच घेताना पकडले होते, ही घटना होते न होते तोच १३ एप्रिल रोजी डोणगावचे ठाणेदार विशाल पाटील यांची बुलडाणा एस.पी. कार्यालयात बदली करण्यात आली आहे.डोणगाव पोलीस स्टेशनचा प्रभार बुलडाणा येथून आलेले पी.आय. बी.बी.सातपुते यांनी घेतला असल्याने डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी घेतलेली लाच ही ठाणेदार विशाल पाटील यांना चांगलीच भोवली. त्यांना बुलडाणा येथे जावे लागले, अशी डोणगावात चर्चा आहे.
डोणगाव येथील ठाणेदाराची तडकाफडकी बदली
By admin | Updated: April 14, 2016 01:45 IST