शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रीकेत चुकाच चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 23:22 IST

बुलडाणा जिल्ह्यात परीक्षार्थ्यांमध्ये गोंधळ; व्याकरणाच्या ५२ चुका आढळल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी शिक्षकासाठीची पात्नता सिद्ध करणारी ह्यटीचर्स इलिजिबिलिटी टेस्टह्ण (टीईटी) २२ जुलै रोजी बुलडाणा येथे २१ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठीच्या छापील प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्या चुकाच चुका आढळून आल्याने शिक्षकांची पात्रता तपासण्याचे काम करणार्‍या यंत्रणेचीच पात्रता तापसण्याची नामुष्की संबंधीत विभागावर ओढावली आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने आज घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी जिल्हय़ातून ८ हजार ३२ उमेदवारांपैकी ७ हजार ४२७ इतक्या उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यात पेपर १ साठी ४ हजार ४७४ व पेपर २ साठी २ हजार ९५३ परीक्षार्थींनी परिक्षा दिली. २१ केंद्रावर ही परीक्षा पार पडली. या परिक्षेदरम्यान पेपर एकमध्ये सुमारे १४ तर पेपर दोन मध्ये सुमारे ३८ व्याकरणाच्या चुका आढळून आल्याने परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला होता. एकूण १५0 प्रश्न असलेल्या पेपर दोन मधील प्रश्न क्रमांक ४२ च्या पर्यायामध्ये अठ्ठेचाळीस ऐवजी ह्यअठेचाकीसह्ण असे छापण्यात आले आहे. तर प्रश्न क्र.६४ मध्ये ह्यपायन्यामध्ये, जानेह्ण अशा प्रकारचे दोन्ही पेपर मिळून सुमारे ५२ व्याकरणाच्या चुका असल्याने अनेक परीक्षार्थी गोंधळून गेले होते. टीईटीच्या प्रश्निपत्रकांमध्ये अशा प्रकारच्या घोडचुका होणे ही गंभीर बाब असून शिक्षकांची पात्रता तपासण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेतील या चुका तपासण्याचे काम संबंधीत विभागाने का केले नाही? असा प्रश्न अनेक परीक्षार्थी उपस्थित करीत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर १0.३0 वाजता होता. त्यासाठी परीक्षा केंद्रावर अर्धातास अगोदर पोहचणे आवश्यक आहे. कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी १0.३0 वाजता परीक्षा केंद्राचे गेट बंद करण्यात आले. तसेच पेपरमध्ये काही व्याकरणाच्या चुका झाल्या असल्यास त्याची परीक्षा परिषदेकडून चौकशी होईल.- एन.के.देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा