शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

३ लाख ८0 हजार विद्यार्थ्यांची चाचणी

By admin | Updated: March 28, 2016 02:09 IST

५ व ६ एप्रिलला परीक्षा; सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक.

हर्षनंदन वाघ / बुलडाणापहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता चाचणी ५ व ६ एप्रिल रोजी घेतली जाणार असून, जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ८0 हजार २५१ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. सदर परीक्षा सर्व व्यवस्थापनाच्या आठ माध्यमांच्या तसेच सर्व बोर्डाच्या शाळेमध्ये होणार असून, शासनाने नियुक्त केलेली त्रयस्थ संस्था जिल्ह्यातील ६५ निवडक केंद्रांवर परीक्षा घेणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजनही केले आहे. भाषा व गणित विषयाचे पेपर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था उपलब्ध करून देणार आहे. गुणवत्तेत मागे असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेता येऊन त्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत आणण्यासाठी शिक्षकाला विशेष प्रयत्न करता यावे, यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे या चाचणीसाठी पुणे येथून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेले पेपर वापरले जाणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील ३ लाख ८0 हजार २५१ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. याअगोदर ऑक्टोबर महिन्यामध्ये अशा प्रकारची गुणवत्ता चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये जिल्ह्यातील जवळपास २0 टक्के विद्यार्थी अप्रगत असल्याचे आढळून आले होते. ही परीक्षा सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. ५ एप्रिल रोजी भाषा तर ६ एप्रिल रोजी गणित विषयाची चाचणी घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेबरोबरच तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षासुद्धा त्याच दिवशी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी विशेष वर्ग घेऊन त्यांना प्रगत करण्याचे निर्देश शासनामार्फत दिले होते. ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन, डिजिटल यंत्नांचा वापर करून अध्यापन, विशेष वर्गाचे आयोजन करून अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला आहे.