शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात समाजकंटकाने लावलेल्या ध्वजाने तणाव

By योगेश देऊळकार | Updated: January 28, 2024 18:28 IST

लोणार रोडवर असलेल्या विशिष्ठ धर्माच्या प्रार्थना स्थळावर दुसऱ्या धर्माचा ध्वज लावलेला असल्याचा प्रकार उघडकीस

सुलतानपूर : येथील विशिष्ट धर्माच्या प्रार्थनास्थळावर अज्ञात समाजकंटकाने दुसऱ्या धर्माचा ध्वज लावल्याचा प्रकार २८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आला. मेहकर पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून तिन संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सध्या सुलतानपुरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

येथील लोणार रोडवर असलेल्या विशिष्ठ धर्माच्या प्रार्थना स्थळावर दुसऱ्या धर्माचा ध्वज लावलेला असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने येथे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या बाबतची फिर्याद शे. अखतर शे. कौसर (वय ४६) यांनी मेहकर पोलिस स्टेशन दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादवी कलम २९५ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक राजेश शिगटे व पोलिस उपनिरीक्षक प्रदीप पाटील यांनी सुलतानपूर येथे पोहचून दोन्ही समाज बाधवांशी चर्चा करून वातावरण शांत केले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे करीत आहेत. हे.कॉ. लक्ष्मण कटक, पो.कॉ. शिवानंद तांबेकर, सुनील नागरे व त्यांचे सहकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.आरोपीचा शोध घेऊन कारवाईची मागणीसुलतानपुरात सर्वधर्मीय समाज बांधव अनेक पिढ्यांपासून अत्यंत बंधुभावाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात राहतात. मात्र, हा घडलेला समाज विघातक असा निंदनीय प्रकार लक्षात घेता पोलिसांनी या घटनेतील आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.