शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर हल्ला करणार्‍यांना दहा वर्षांची  शिक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:16 IST

बुलडाणा: पेट्रोलिंग करीत असताना चौकशी करणार्‍या  पोलिसांवर चाकू हल्ला करणार्‍या तीन आरोपींना १0 वर्षांचा  सo्रम कारावास व ५ हजार तसेच २ हजार रुपये दंडाची शिक्षा   प्रथम सत्र न्यायाधीशांनी १0 ऑक्टोबर रोजी सुनावली. 

ठळक मुद्देचौकशी करणार्‍या पोलिसांवर आरोपींनी केला होता चाकू हल्लातीन आरोपींना १0 वर्षांचा सo्रम कारावास व दंड

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पेट्रोलिंग करीत असताना चौकशी करणार्‍या  पोलिसांवर चाकू हल्ला करणार्‍या तीन आरोपींना १0 वर्षांचा  सo्रम कारावास व ५ हजार तसेच २ हजार रुपये दंडाची शिक्षा   प्रथम सत्र न्यायाधीशांनी १0 ऑक्टोबर रोजी सुनावली. बुलडाणा तालुक्यातील सैलानी ट्रस्ट इमारतीजवळ पोलीस  कॉन्टेबल वासुदेव खराटे व o्रीराम व्यवहारे यांना सकाळी  पेट्रोलिंग करीत असताना २७ सप्टेंबर २0१२ रोजी आरोपी  आनंद चंद्रभान पवार, किशोर ऊर्फ सोनू भोसले तसेच विजय  सोनू भोसले हे संशयितरीत्या विनानंबर दुचाकीसोबत निदर्शनास  पडले. त्यांच्याकडे दुचाकीची कागदपत्रे नसल्याने चेकिंग मेमोवर  सही करण्यासाठी सांगितले असता तिघांनी सही करण्यास नकार  दिला व पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी o्रीराम  व्यवहारे यांच्याशी वाद घातला. त्यामुळे o्रीराम व्यवहारे यांनी  आरोपी आनंद पवार व किशोर भोसले यांना पकडले. त्यानंतर  आनंदा पवार याने त्याच्या जवळील चाकू o्रीराम व्यवहारे यांचे  पोटात खुपसला व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. झटापटीत आरो पी यांनी दोन्ही पोलिसांच्या हातून निसटून पळून गेले. त्यानंतर  जखमी अवस्थेत o्रीराम व्यवहारे यांना शिवाजी रिंढे व यांचे  ऑटोरिक्षात दवाखान्यात बुलडाणा येथील शासकीय रुग्णालयात  भरती करण्यात आले. सदर घटनेची तक्रार वासुदेव खराटे यांनी  दिल्यानंतर तिन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा  नोंदविण्यात आला. सरकार पक्षाने सदर प्रकरणात १७ साक्ष- पुरावे तपासले. सर्व साक्षीदारांचे साक्ष-पुरावे झाल्यानंतर विद्यमान  जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस. तिवारी यांनी आरोपींनी १0  वर्ष सo्रम कारावास व रुपये ५ हजार दंड  तसेच कलम ३३३,  ३४ भादंविनुसार तीनही आरोपींना १0 वर्ष सo्रम कारावास अशी  शिक्षा ठोठावली. -