शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना

By admin | Updated: May 26, 2015 02:26 IST

निराधार योजना समित्या अस्तित्वात नसल्याने लाभार्थी अडचणीत.

बुलडाणा : संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकास्तरावरील समित्या अस्तित्वात नसताना निराधार योजनांच्या लाभार्थींंचे अनुदान मंजूर करण्याचे अधिकार संबंधित तालुक्याच्या उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले होते. हे अधिकार काढून आता तालुका तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांंची अडचण दूर झाली आहे. निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्ता महिला आदी दुर्बल घटकातील व्यक्तींना विविध योजनांमधून दरमहा अनुदान दिले जाते. पात्र लाभार्थींंना अनुदान मंजूर करण्यासाठी शासनाच्यावतीने तालुका पातळीवर समितीची स्थापना करण्यात ये ते. समितीचे अध्यक्ष व सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे अधिकारी किंवा कार्यकर्ते असतात. समितीचे सदस्य सचिव म्हणून तहसीलदार काम पाहतात. आलेल्या अर्जांंची छाननी करून समितीकडून अनुदान मंजूर केले जाते; मात्र निवडणुकीनंतर राज्यात भाजपा-सेनेचे सरकार आल्याने पूर्वीच्या समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाभार्थींंंचे अर्ज प्रलंबित राहतात. यावर उपाय म्हणून शासनाने २0१0 मध्ये लाभार्थींंचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकार्‍यांना दिले होते. आता हे अधिकार तालुका तहसीलदारांच्या सुपूर्द करण्यात आले आहेत.