शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी तहसीलदार राठोड तडकाफडकी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 13:08 IST

अमरावती विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी ३१ जुलै रोजी एक आदेश पारीत केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर :  तालुक्यातील आलेवाडी येथील शेतीची आपसात वाटणी करण्यासाठी २० हजाराची लाच स्वीकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संग्रामपूरचे प्रभारी तहसीलदार समाधान राठोड यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भात अमरावती विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी ३१ जुलै रोजी एक आदेश पारीत केला आहे. संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी येथील नागरिकांनी ३० डिसेंबर २०१९ रोजी शेतीची आपसात वाटणी करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज दाखल केला होता. अर्ज देऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही तहसीलदारांकडून या अर्जावर कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, ३ जून रोजी तहसीलदारांची भेट घेतली असता, त्यांनी ३ जून रोजी तहसील कार्यालयात भेटायचे सांगितले. त्यावेळी वाटणी पत्राबाबत बोलणे झाल्यानंतर तहसीलदारांनी भ्रमण दूरध्वनीवरून संबंधितांना जळगाव जामोद रोडवर बोलावले. या रस्त्यावरील एका निंबाच्या झाडाखाली तहसीलदारांनी सदर वाटणीपत्राचे वीस हजार रूपये रोख घेऊन आठ दिवसाच्या आत काम करून देणार असल्याचे सांगितले. मात्र, पैसे घेऊनही तहसीलदारांनी वाटणी पत्र करून दिले नाही. दरम्यान, याप्रकरणी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर केला. त्यानंतर अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी तात्काळ प्रभारी तहसीलदार समाधान राठोड यांना निलंबित करून त्यांना मुख्यालयी अ‍ॅटच करण्यात आले आहे. या कारवाईमुळे संग्रामपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव