शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

चिमुकल्या भाच्यासह शिक्षकाची आत्महत्या

By admin | Updated: January 26, 2015 00:30 IST

अकोला जिल्ह्यातील घटना; मोटारसायकलसह विहिरीत घेतली उडी.

अकोला: चिमुकल्या भाच्यासह शिक्षक असलेल्या मामाने गुडधीजवळील एका शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रथमदर्शनी ही घटना आत्महत्या वाटत असली तरी, यामागे घातपात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जठारपेठेतील सातव चौकामध्ये राहणारा संदीप सज्जनलाल गुप्ता (२८) हा त्याचा भाचा ऋषिकेश शंभुनाथ गुप्ता(८) याला एमएच ३0 एडी ३५२ क्रमांकाच्या मोटारसायकलवर घेऊन शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घराबाहेर पडला. ऋषिकेशला घेऊन संदीप गुडधी गावाजवळील नारायण लहामगे यांच्या शेतामध्ये घेऊन गेला. लहामगे यांच्या शेतामध्ये मोठी विहिर आहे. याठिकाणी मामा-भाचे सायंकाळपर्यंत खेळत होते, असे काही प्रत्यक्षदश्री शेतमजूरांनी सांगितले. सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान संदीपने ऋषिकेशला मोटारसायकलवर बसवून विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. संदीपला आत्महत्याच करायची होती, तर त्याने ऋषिकेशला सोबत का घेतले, आणि मोटारसायकलसह पाण्यात उडी का घेतली, आदी प्रश्न उपस्थित होत असून, ही आत्महत्या आहे की घातपात, त्याचे आत्महत्येचे नेमके कारण काय, आदी प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत. *हळद लागण्यापूर्वीच संपविले आयुष्यअकोल्यातील एका खासगी शाळेत क्रीडा शिक्षक असलेल्या संदीप गुप्ताचा मुंबईतील एका मुलीशी २४ जून रोजी साखरपुडा झाला होता. २९ जानेवारी रोजी त्याचे मुंबई येथे लग्न होणार होते. परंतू हळद लागण्यापूर्वीच त्याने आयुष्याचा त्याग केला. त्याच्यासोबत चिमुकल्या ऋषिकेशलाही प्राणाची किंमत मोजावी लागली.*संदीपवर होता विनयभंगाचा आरोप जठारपेठ परिसरातील एका शिकवणी वर्गामध्ये नोकरी करणार्‍या एका युवतीने २ डिसेंबर २0१४ रोजी संदीपविरूद्ध पोलिसांकडे तक्रार दिली होती. ती शिकवणी वर्गाकडे जात असताना, संदीपने तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. युवतीच्या तक्रारीनुसार सिव्हील लाईन पोलिसांनी संदीपविरुद्ध भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. या वादातून तर त्याने आत्महत्या केली नसावी असा पोलिसांना संशय आहे.