शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

संचमान्यता रखडल्याने शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 11:52 IST

Khamgaon News : शाळा बंद असल्यामुळे जिल्ह्यात दोन वर्षांपासून संचमान्यताही झाली नाही.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला असून, गत दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळे जिल्ह्यात दोन वर्षांपासून संचमान्यताही झाली नाही. त्यामुळे शिक्षकांची पदोन्नतीही रखडली आहे.दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी असलेल्या शाळेच्या पटसंख्येनुसार संचमान्यता होते. शाळेत पटावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळेत  किती शिक्षकांची गरज आहे, हे ठरविण्यात येते. यामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी कमी आहेत, तेथील शिक्षक अतिरिक्त ठरतात; तर ज्या शाळेत पटावरील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, त्या शाळेत शिक्षकांची बदली करण्यात येते. तसेच काही शिक्षक सेवानिवृत्त होतात किंवा अन्य कारणांमुळे जागा रिक्त होतात. गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण शाळा बंद होत्या. त्यामुळे संचमान्यता झाली नाही.  त्यामुळे शिक्षक समायोजनाचा प्रश्न कायम असून, अनेकांना पदोन्नतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच संचमान्यता झाली नसल्यामुळे शाळांमधील शिक्षक संख्या तसेच अतिरिक्त शिक्षकांचे गणित सध्या बिघडले आहे. एकीकडे अतिरिक्त शिक्षक, तर दुसरीकडे रिक्त पदे असे काहीसे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. या वर्षी अद्याप पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत.  पुढील महिन्यातही शाळा सुरू होण्याबाबत निश्चिती नाही. त्यामुळे या वर्षीही संचमान्यता होईल की नाही, याबाबत संभ्रम आहे. परिणामी शिक्षकांमधील चिंता वाढली आहे.

गत दोन वर्षांपासून संचमान्यता झाली नाही. ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार संचमान्यता करून शिक्षक निर्धारण करण्यात येते. मात्र गतवर्षी कोरोना आजारामुळे शाळा भरलीच नाही. त्यामुळे संचमान्यता झाली नाही. - गजानन गायकवाडगटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खामगाव

गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात संच मान्यता झाली नाही. त्यामुळे पदोन्नती व शिक्षक निर्धारण प्रक्रिया रखडली आहे. शासनाने लवकरात लवकर संचमान्यता करायला हवी. यामुळे शिक्षक निर्धारण होईल व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.- विठ्ठल पाटेखेडे,शिक्षक सेना, बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगावTeacherशिक्षक