शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्याला १३७0 लाभार्थींंचे लक्ष्यांक

By admin | Updated: August 27, 2016 03:02 IST

विशेष घटक योजना; शंभर टक्के अनुदानावर दिला जातो लाभ.

नाना हिवराळे खामगाव, दि. २६: अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकर्‍यांसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी विशेष घटक योजना कार्यरत असून, सन २0१६-१७ या वर्षात बुलडाणा जिल्ह्यात १३७0 लाभार्थींंचे लक्ष्यांक देण्यात आले आहे. या योजनेत १00 टक्के अनुदानावर शेतकर्‍यांना लाभ दिला जातो.अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकर्‍यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. विशेष घटक योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत १00 टक्के अनुदानावर लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत पीक संरक्षण अवजारे, शेतीचे सुधारित अवजारे, बैलगाडी, बैलजोडी, जुनी विहीर दुरुस्ती व नवीन विहिरीसाठी अनुदान देण्यात येते. या योजनेकरिता लाभार्थी निवडीची प्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्यातील १३ ही पंचायत समित्यांना लक्ष्यांक देण्यात आले आहे. सन २0१६-१७ साठी लाभार्थी निवड करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. या योजनेकरिता नवीन विहिरीकरिता अनुदान र्मयादा एक लाख रुपये एवढी तर बैलजोडीसाठी ५0 हजार रुपये अनुदान र्मयादा ठेवण्यात आली आहे.दारिद्र्य रेषेखालील शेतकर्‍यांना प्रथम प्राधान्य देण्यात येत असले तरी या संवर्गातील लाभार्थी उपलब्ध न झाल्यास अन्य लाभार्थी याच सवलतीत निवडण्यात येणार आहेत. लाभार्थी निवडीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.