शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्ती अध्यक्षपद निवडीसाठी तंटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 01:46 IST

लोणार तालुक्यातील वेणी येथील तंटामुक्त अध्यक्षपदासाठी आठ वर्षांनंतर प्रथमच गुप्त मतदान घेण्याची मागणी.

लोणार(जि. बुलडाणा), दि. २२ : तालुक्यातील वेणी येथील तंटामुक्त अध्यक्षपदासाठी आठ वर्षांनंतर प्रथमच गुप्त मतदान घेण्याची मागणी नवयुवकासह गावकर्‍यांनी केली आहे.सर्व गावकर्‍यांच्या संमतीने तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड करावी, असा कायदा आहे; मात्र सर्वानुमते निवड करण्याऐवजी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच तंटा होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांच्या या भुमिकेमुळे नऊ वर्षांपासून तंटामुक्ती अध्यक्ष असलेले मनोज तांबिले यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. तंटामुक्ती अध्यक्ष पदावर गेली नऊ वर्षे मनोज तांबिले अविरोध निवडून येत आहेत; परंतु नऊ वर्षांनंतर प्रथमच वेणी गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी गुप्त मतदान घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असून, त्याप्रमाणे दहा उमेदवारांनी अर्जदेखील दाखल केले आहेत. यामध्ये अनिता संतोष खोतकर, नम्रता प्रताप देशमुख, नारायण देशमुख, विठ्ठल साखरे, प्रल्हाद इंगळे, मनोज तांबिले, प्रवीण देशमुख, श्रीराम ढगे, उत्तम मोरे, डॉ. रामकिसन बागल यांच्या अर्जाचा समावेश आहे. तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी १४ ऑगस्ट रोजी सरपंच अभिमन्यू साखरे, पोलीस पाटील राजू शेवाळे, सचिव सतीश अंभोरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली; परंतु गुप्त मतदानाच्या मागणीमुळे ही बैठक तहकूब करण्यात आली. २४ ऑगस्ट रोजी गुप्त मतदान पद्धतीने अध्यक्ष निवडीसाठी बैठक घेण्यात येणार आहे.