शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या नावाखाली तलाठ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 11:44 IST

काही गावांमध्येच तलाठ्यांनी खासगी व्यक्तींची नेमणूक केली असून, दाखले व इतर महत्वाचे कागदपत्र देण्याचे काम करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अनेक गावांमध्ये तलाठी फिरकतच नसल्याचे चित्र आहे. मंडळ कार्यालयात बसूनच मुख्यालयाचा कारभार करण्यात येत आहे. काही गावांमध्येच तलाठ्यांनी खासगी व्यक्तींची नेमणूक केली असून, दाखले व इतर महत्वाचे कागदपत्र देण्याचे काम करत आहेत.जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांनी मुख्यालयाला भेट देणे अपेक्षीत आहे. मात्र, गत काही दिवसांपासून कोरोनाच्या नावाखाली अनेक तलाठी नेमुन दिलेल्या गावांमध्ये फिरकतच नसल्याचे चित्र आहे. तलाठ्यांनी आठवडी बाजार असलेल्या गावात कार्यालये घेतली आहेत. या गावातूनच तलाठी कारभार हाकत असल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, परिसर सील करणे, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे व तसेच विद्यार्थी व शेतकऱ्यांना वेळेवर गावातच दाखले मिळावे, यासाठी तलाठ्यांनी नेमुन दिलेल्या गावात भेट देणे अपेक्षीत आहे. मात्र, अनेक गावांमध्ये विशेषत: दुर्गम भागात तलाठी फिरकतच नसल्याचे चित्र आहे. सध्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी विविध दाखल्यांची गरज आहे. विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना तलाठ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. अनेक गावांमध्ये खासगी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. तेच ग्रामस्थांना कागदपत्रे वितरण करण्याचे काम करीत असल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देउन तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्याची मागणी होते.

खासगी व्यक्तींची नियुक्तीधामणगाव धाडसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तलाठ्यांनी खासगी व्यक्तीची नियुक्ती केली आहे. तलाठी कार्यालय बंद राहत असल्याने ढालसांवगी, सोयगांव, पांगरखेड, वरूड धामणगांवसह धाड भाग दोन मधील शेतकरी व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. महीला कर्मचारी सुटीवर एकाच तलाठ्यावर कामाचा ताण वाढला आहे. खासगी व्यक्तीच गावातील कारभार पाहत असल्याचे चित्र आहे. अनेक तलाठ्यांकडे चार ते पाच गावांचा प्रभार दिलेले आहे. त्यामुळे, तलाठी यापैकी एकाही गावात जात नसल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा