शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चे झोपा काढो आंदोलन

By admin | Updated: August 2, 2016 01:34 IST

शासनाकडून शेतक-यांची थट्टा; तहसीलदारास निवेदन.

खामगाव (जि. बुलडाणा) : सन २0१५ या मागील वर्षात तालुक्यातील दुष्काळग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना एकरी फक्त २८ रु. ८0 पै. पीक विमा मंजूर करुन शेतकर्‍यांची थट्टा केली आहे. याबाबत निवेदन दिल्यानंतरही अद्याप दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी नांदुरा तहसीलदार वैशाली देवकर यांच्या दालनातच शेकडो शेतकर्‍यांसह ह्यझोपा काढोह्ण हे अभिनव आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांचे नेतृत्वात करण्यात आले. याबाबत तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २0१५ च्या हंगामात तालुक्यात ९0 टक्के सोयाबीनची पेरणी झाली असताना उशिरा आलेल्या व अत्यल्प झालेल्या पावसामुळे सोयाबीनला फुले व शेंगा सुध्दा लागलेल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना पेरणी मोडावी लागली होती. या नुकसानीच्या गावनिहाय, समितीसह, गटांचे पंचनाम्यावर सुध्दा उत्पन्न निरंक (शून्य) आलेले आहेत. अशा भीषण दुष्काळजन्य परिस्थितीमुळे राबराब राबून जगाला धान्य पुरविणार्‍या शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आलेली असताना तालुक्यातील दुष्काळग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना एकरी २८ रु. ८0 पै. पीक विमा मंजूर करण्यात आला. याबाबत १२ जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन देवून शेतकर्‍यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली होती. मात्र या निवेदनाची अधिकार्‍यांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांच्या, प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेमुळे शासनाची दिशाभूल करीत, शासनाला बदनाम करुन शेतकर्‍यांची क्रूर थट्टा करण्यात आली असून प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांचे नेतृत्वात सदरचे आंदोलन करण्यात आले.