शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याप्रकरणी कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST

खा.सुळे जिल्हा दौऱ्यावर आल्या असता भाजयुमोच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. आरोग्य विभागातील गट क व गट ड च्या ...

खा.सुळे जिल्हा दौऱ्यावर आल्या असता भाजयुमोच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. आरोग्य विभागातील गट क व गट ड च्या ६००० जागांसाठी २५ व २६ सप्टेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थ्यांकडून ५२० रुपये परीक्षा शुल्क तर आरक्षित प्रवर्गातून २७० रुपये प्रती अर्ज वसूल करण्यात आलेले आहे. याचाच अर्थ कंपनीने अर्ज भरलेल्या लाखो परीक्षार्थ्यांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केलेली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करताना ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्यानंतर तत्काळ मान्य न करता २४ तासांनी मान्य केल्याचे दिसत होते. काही प्रकरणांमध्ये २४ तासांनी सुद्धा शुल्क मान्य केल्याचे दिसून आले नाही; मात्र, खात्यातून पैसे कापले गेले. त्यामुळे काही परीक्षार्थींना नव्याने परीक्षा शुल्क भरावे लागले. अशा प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपये कंपनीने अतिरिक्त वसूल केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. परीक्षार्थींना दूरचे परीक्षा केंद्र दिलेले असल्याने परीक्षार्थींना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासास सामोरे जावे लागले आहे. २४ सप्टेंबरच्या रात्री १० वाजता या परीक्षा आरोग्य विभागाने रद्द केल्या. परीक्षार्थींना त्यांचे भरलेले परीक्षा शुल्क, परीक्षेसाठी गेलेल्या प्रवासाचे भाडे व झालेल्या खर्चापोटी प्रती परीक्षार्थी १० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी सुद्धा भाजयुमो चिखलीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी संतोष काळे पाटील, पंजाबराव देशमुख, सागर पुरोहित, शिवाजी वाघ, भारत सोळंकी, कय्युम शाह, दीपक भाकडे, संदीप लोखंडे, सचिन गरड, नाना जोशी, शिवराज साप्ते, सिद्धेश्वर मोरे, कैलास घाडगे, आदिनाथ जाधव, आकाश काळे व इतरांची उपस्थिती होती.