शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समितीचा महिलांना ठेंगा!

By admin | Updated: September 14, 2016 00:37 IST

बुलडाणा जिल्ह्यातील तंटामुक्त समितींची निवड नियमांना डावलून झाल्याचा प्रकार.

बुलडाणा, दि. १३: लोकसहभागाची चळवळ असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत ३0 टक्के महिलांचा सहभाग असणे आवश्यक आहे; मात्र तंटामुक्ती समितीची निवड शासनाच्या नियमांना डावलून होत आहे. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदापासून महिलांना दूरच ठेवल्या जात असल्याने जिल्ह्यात तंटामुक्त समितीचा महिलांना ठेंगा दाखविला जात असल्याचे दिसून येत आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. महिला ही आता केवळ चूल आणि मूल एवढीच र्मयादित न राहता प्रत्येक क्षेत्रात सहभागी दिसून येते. शेतातील कामांपासून ते शासकीय अथवा खासगी नोकर्‍यांमध्ये महिलाचा सहभाग पाहावयास मिळतो; मात्र तंटामुक्त समितीच्या अध्यपदावर ३0 टक्के महिलांचा सहभाग आवश्यक असल्याचा नियम असूनदेखील महिलांना तंटामुक्ती समितीपासून दूर ठेवल्या जात आहे. महात्मा गांधी तंटामुक्त अभियानास २00७ पासून सुरुवात झाली. तंटामुक्ती यशस्वी करण्यासाठी गावोगावी तंटामुक्ती समितीची स्थापना करण्यात आली; मात्र या समितीच्या अध्यक्षपदापासून महिलांना दूरच ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात तंटामुक्त समितीत महिला अध्यक्षांची संख्या शून्य आहे. तंटामुक्त अभियानात महिलांचा सहभाग ३0 टक्के असावा, असे शासनाचे आदेश असताना महिलांना अध्यक्षपदापासून दूरच ठेवण्यात आले आहे. गावचा पोलीस पाटील तंटामुक्त समितीचा पदसिद्ध सचिव असतो. त्यामुळे येथेही संधी कमीच आहे. महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात महिलांची उपस्थिती नगण्यच असते. महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदावर पुरुषच वरचढ असून महिलांना अनभिज्ञ ठेवण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावरूनच गावात तंटे उभे राहिल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष घालून महिलांनासुद्धा तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद देण्याची संधी निर्माण करणे गरजेचे आहे.