शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

थकीत करापोटी जप्तीची कारवाई!

By admin | Updated: February 12, 2016 02:04 IST

खामगाव पालिकेला ९0 टक्के करवसुलीचे उद्दिष्ट.

खामगाव : चालू आर्थिक वर्षाची ५ कोटी १२ लाख ७0 हजार रुपये कराची मागणी व मागील ३ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने आर्थिक वर्ष समाप्तीच्या पृष्ठभूमीवर धडक मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, कराचा भरणा न करणार्‍या काही व्यापारी प्रतिष्ठानांसह मालमत्ताधारकांकडून मालमत्ता जप्त करण्याच्या दृष्टीने पालिकेने पावले टाकली आहेत. प्रसंगी सोमवारी आनुषंगिक कारवाई करण्याची शक्यता पालिकेतील सूत्रांनी व्यक्त केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी पालिका म्हणून खामगाव पालिकेचा लौकिक आहे. जवळपास ९७ हजार लोकसंख्या असलेले खामगाव शहर जिल्ह्याची मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते. त्यानुषंगाने शहरातील काही व्यापारी प्रतिष्ठानांकडे पालिकेचा तीन ते चार वर्षांंपासूनचा कर थकीत आहे. त्यातच पालिकांना यावर्षी किमान ९0 टक्के करवसुलीचे उद्दिष्ट नगरविकास विभागाकडून देण्यात आले आहे. सोबतच पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी पालिकांना करवसुलीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. या सुविधांच्या दर्जावरच पालिकांना येत्या काळात राज्य शासनाकडून अनुदान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी पालिकांना करवसुलीच्या उद्दिष्टाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने आता उर्वरित दीड महिन्यांत वेगवान हालचाली करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळेच पालिकेने करवसुली मोहीम हाती घेतली आहे.