शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी घेतली बळीराजाच्या संरक्षणाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:22 IST

डोणगाव : येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक शाळे तील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी २२ ऑगस्ट रोजी मातीच्या बैलांचा  पोळा भरवून बळीराजाच्या संरक्षणाची व बैल कत्तलखान्यात जाऊ  न देण्याची सामूहिक शपथ घेतली. चिमुकल्यांच्या तोंडून शे तकर्‍यांच्या संरक्षणाच्या पडणार्‍या या शब्दांनी सर्वांचेच लक्ष  वेधले. 

ठळक मुद्देविठ्ठल रुखमाई प्राथमिक शाळेचा उपक्रम विद्यार्थ्यांनी भरविला मातीच्या बैलांचा पोळा

डोणगाव : येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक शाळे तील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी २२ ऑगस्ट रोजी मातीच्या बैलांचा  पोळा भरवून बळीराजाच्या संरक्षणाची व बैल कत्तलखान्यात जाऊ  न देण्याची सामूहिक शपथ घेतली. चिमुकल्यांच्या तोंडून शे तकर्‍यांच्या संरक्षणाच्या पडणार्‍या या शब्दांनी सर्वांचेच लक्ष  वेधले. स्थानिक श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये सर्व प्रथम चिमुकल्यांनी सोबत आणलेले मातीचे बैल शाळेत एकत्र  ठेवून पोळा भरविण्यात आला. व त्यानंतर त्यांची आरती करून  पूजा करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक आत्माराम दांदडे, हेमंत जोशी व संजीव भार ते यांनी शिक्षक व विद्यार्थी यांना शेतकरी व बैल यांच्या  संबंधाविषयी माहिती देऊन त्यांचे संगोपन करावे, असे सांगितले.त्यानंतर शिक्षक संजीव भारते यांनी व विद्यार्थी व शिक्षक यांनी  आम्ही बैलाची पूजा करतो, तो आमचा मित्र आहे. शेती कामात  मशागतीच्या वेळी तो आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतो,  म्हणून आम्ही त्याच्या संरक्षणाची शपथ घेतो व म्हातारपणीही  आम्ही त्याचे संगोपन करू व आम्ही त्याला कत्तलखान्यात जाऊ  देणार नाही, अशी शपथ चिमुकल्यांनी घेतली. यावेळी शालेय  शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. 

पोशिंदा जगण्याकरिता शेतकर्‍यांची शपथ पोळा सणाच्या दिवसाचे औचित्य साधून जगाचा पोशिंदा  जगण्याकरिता तसेच त्याला नैतिक पाळबळ देण्याकरिता मेहकर  तालुक्यातील बार्‍हई गावातील शेतकर्‍यांनी सामूहिक शपथ घे तली. शेतकरी हा सर्व जनतेचा पोशिंदा आहे. शेतकरी पिकवतो,  त्यामुळे सर्वांच्या पोटाची खळगी भरते; परंतु आज तोच पोशिंदा  निसर्गाच्या अवकृपेने त्रस्त आहे. कर्जाच्या बोझ्याखाली दपत  असून, आत्महत्येला जवळ करीत आहे. शेतकर्‍यांच्या वाढत्या  आत्महत्येच्या पार्श्‍वभूमीवर या पोशिंद्याला नैतिक पाठबळ  देण्यासाठी ‘आम्ही तुझ्या सोबत आहोत’ ही शपथ मेहकर तालु क्यातील बार्‍हई येथील गावकर्‍यांच्यावतीने घेण्यात आली.   बार्‍हई येथील धर्मवीर प्रतिष्ठानच्या नवयुवकांनी शेतकर्‍यांना नै ितक पाठबळ देण्यासाठी शपथ घेतली. यावेळी धर्मवीर प्रतिष्ठानचे  अध्यक्ष वैभव सुभाष पागोरे, सचिन अनंतराव पागोरे, कैलास  दत्तात्रय पागोरे, गजानन अंबादास पागोरे, निखिल विजय पागोरे,  अरविंद भारत पागोरे, धनंजय व्यंकट पागोरे, नंदकिशोर पागोरे,  मदन पागोर, प्रताप मदन पागोरे, विनोद महादू पागोरे, सतीश रमेश  पागोरे, ऋषिकेश राजेंद्र पागोरे, पवन प्रदीप पागोरे व गावकरी उ पस्थित होते.