शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:22 IST

परिसरात स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक झाला असून,  खामगावातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर  अन्य तिघांवर अकोल्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळे  आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले असून, नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ठळक मुद्देएकाचा मृत्यू संशयित तिघांवर अकोल्यात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: परिसरात स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक झाला असून,  खामगावातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर  अन्य तिघांवर अकोल्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळे  आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले असून, नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्गजन्य असलेला स्वाइन फ्ल्यू जिल्हय़ात झपाट्याने  पसरत आहे. मागील घटनांमध्ये एक संशयित व एक लागण  झालेला रुग्ण दगावला. आजपर्यंत काही रुग्णांच्या घशातील  द्रवाचे नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. अकोला सवरेपचार  रुग्णालयामध्ये स्वाइन फ्लू रुग्णांकरिता असलेल्या विशेष  कक्षात खामगाव परिसरातून आलेल्या तीन संशयित रुग्णांवर  उपचार करण्यात येत आहेत. एच १, एन १ आजारांच्या  विषाणूचे वहन वराहाकडून होत असले तरी विद्यमान स्थिती त हे संक्रमण मॅन टू मॅन संसर्गामुळे वाढत आहे. रोगाची  लागण ही मधुमेही, अतिरिक्त दाबाचे रुग्ण, गरोदर स्त्रिया व  प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना त्वरित होते. त्यामुळे  अशा व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. स्वाइन  फ्ल्यूचे निदान रुग्णांच्या थुंकी तपासणीतूनच होते. ही त पासणी एनआयव्ही नागपूर किंवा पुणे येथेच होते. सदर  रुग्णांचे सॅम्पल घेऊन तपासणीकरिता पाठविण्यात येते.  यामुळे रुग्णाचे योग्य निदान होण्यात कालावधी जातो.  त्यामुळे अशा रुग्णांची तातडीने तपासणी व्हावी व  आवश्यक चाचण्यांकरिता आरोग्य प्रशासनाने हायटेक  यंत्रणा राबवावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांनी  गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य  विभागाने केले आहे.

लक्षणे आढळताच करावा उपचारबाधित रुग्णांच्या नाकातील व घशातील स्त्राव, त्याचा घाम,  थुंकी यामधून या आजाराचे संक्रमण होते. ताप येणे, खोकला  येणे, घसा दुखणे, नेहमी अतिसार, उलट्या होणे, श्‍वास  घेण्यास त्रास होणे, मांसपेशी दुखणे, अंगदुखी, डोके दुखणे,  औषधोपचारानंतर ताप कमी न होणे अशी लक्षणे आढळताच  रुग्णाला सवरेपचार रुग्णालयातील विशेष कक्षात दाखल  करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

लोणार तालुक्यातही संशयिताचा मृत्यूलोणार तालुक्यातील खुरमपूर येथील तरुणाचा स्वाइन फ्लूने  मृत्यू झाल्याच्या चर्चेने आरोग्य विभागात खळबळ उडाली  आहे. लोणार तालुक्यातील खुरमपूर येथील तरुण शे तकर्‍याला आठ दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यामुळे  त्यांच्यावर लोणार मेहकर येथील खासगी रुग्णालयात प्रथमो पचार केल्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात  दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी सदर रुग्णाला  स्वाइन फ्लू असल्याचा संशय व्यक्त करून उपचाराला  सुरुवात केली होती; मात्र उपचारादरम्यान या शेतकर्‍याचा मृ त्यू झाला.