शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 15:07 IST

फेरीवाल्यांच्या मोबाईल अ‍ॅप सर्वेक्षणासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : फेरीवाल्यांच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे सर्वेक्षणास खामगाव शहरातील फेरीवाल्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहरातील फेरीवाल्यांचे मोबाईल अ‍ॅप सर्वेक्षण रखडल्याचे दिसून येते.केंद्र शासनाच्या पथ विक्रेता(उपजिविका संरक्षण व पथविक्री विनिमन) अधिनियम-२०१४ मधील कलम ३६(१) अन्वये राज्य शासनाचे पद पथावरील पथविक्रेता उपजिविका संरक्षण व पथविक्री विनिमन महाराष्ट्र नियम २०१६ तसेच कलम ३८ (१) अन्वये पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनिमन) महाराष्ट्र योजना २०१७ मंजूर केली आहे.या योजनेतंर्गत खामगाव नगर पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे मोबाईल अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. गत काही दिवसांपासून या मोहिमेला फेरीवाल्यांकडून अतिशय अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे फेरीवाल्याचे मोबाईल सर्वेक्षण रखडल्याचे समोर येत आहे.दरम्यान, जिल्ह्यातील अन्य पालिकांमध्येही अशीच स्थिती आहे. दुसरीकडे राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचीही पालिकांकडून अपेक्षीत अशी प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची ओरड होत आहे. सर्वेक्षणासाठी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत !खामगाव नगर पालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या मोबाईल अ‍ॅप सर्वेक्षणासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. या मुदतीत मोबाईल सर्वेक्षण पूर्ण करावे तसेच अधिक माहितीसाठी शहर अभियान व्यवस्थापक राजेश झनके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या आहेत सर्वेक्षणासाठी आवश्यक बाबी! शहरातील परवानाधारक/ विना परवाना धारक फेरीवाला व्यावसायिकांनी त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल क्रमांक) आधार कार्डशी संलग्न (लिंक) करून घ्यावेत. त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्सप्रत, रेशनकार्डची झेरॉक्स प्रत, दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र, विधवा/एकल माता असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, अनुजाती/ जमाती प्रवर्गात समावेश असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र आदी दस्तवेज सादर करून मोबाईल सर्वेक्षण पूर्ण करावे.

 

टॅग्स :khamgaonखामगाव