शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी विकणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:40 IST

एका मेडिकल्सचा परवाना रद्द : नियमांना केराची टोपली दाखविणे भोवले बुलडाणा : शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन ...

एका मेडिकल्सचा परवाना रद्द : नियमांना केराची टोपली दाखविणे भोवले

बुलडाणा : शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन न करता मनमर्जीने औषधी विकणे जिल्ह्यात चांगलेच भोवले आहे. कारण, जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील ५३ औषधी विक्री केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले असून, एका मेडिकल्सचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

१३ तालुके असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात हजाराच्या ज‌‌वळपास परवानाधारक औषधी विक्री केंद्रे आहेत. या केंद्रांची मागील सात महिन्यांत अन्न व औषध विभागाने केल्या पडताळणीत तब्बल ५३ मेडिकल्समध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. या औषधी विक्री केंद्रचालकांना याबाबत खुलासाही मागविण्यात आला होता. मात्र, खुलाशाला साजेसे असे उत्तर न मिळाल्याने अखेर अन्न व औषध प्रशासनाने या औषधी विक्री केंद्राचे परवाने निलंबित केले असल्याची माहिती आहे. पुढील काळातही या औषधी विक्री केंद्रावर विशेष लक्ष असून, त्यामध्येही त्रुटी आढळल्यास त्या संचालकांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यामुळे झाले परवाने निलंबित

अन्न व औषध विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ५३ औषधी विक्री केंद्रांमध्ये परवाना मिळविण्यासाठी आ‌वश्यक असणाऱ्या अटींचे पालन न करणे, स्टाॅकची उपलब्धता किती आहे, याचे विवरण नसणे, खरेदी-विक्रीचे रेकॉर्ड नसणे, डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी विकणे यासह इतर कारणामुळे जिल्ह्यातील ५३ औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

चिखलीच्या एका मेडिकल्सचा परवाना रद्द

चिखली येथील एका मेडिकल्सचा परवाना अन्न व औषधी विभागाने रद्द केला आहे. या मेडिकल्सच्या संचालकाकडे औषधी खरेदी विक्रीचे बिलच नव्हते. असलेले रेकॉर्डही समाधानकारक नसल्याने या मेडिकल्सचा परवाना रद्द करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच औषधी विक्री करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांना अनेकजण बगल देताना दिसतात. अशांवर अन्न व औषध विभागाचा वॉच असून, यांच्यावर कारवाई केली जात आहे.

-अ.तु. बोर्डे, सहायक आयुक्त, औषधी विभाग, बुलडाणा