शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानपूर : नगर विकास आघाडीचे बहुमत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:20 IST

सुलतानपूर: संपूर्ण लोणार तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या  सुलतानपूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुलतानपूर नगर  विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवित सरपंचपदी चंद्रकला  नथ्थू अवचार यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला. 

ठळक मुद्देचंद्रकला अवचार व छाया पनाड यांच्यात झाली सरळ लढतसरपंचपदी - चंद्रकला नथ्थू अवचार वडगाव तेजन : विकास आघाडी पॅनलचा विजय

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर: संपूर्ण लोणार तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या  सुलतानपूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुलतानपूर नगर  विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवित सरपंचपदी चंद्रकला  नथ्थू अवचार यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला. यावेळी प्रथमच सरपंच पदाची निवड जनतेतून होती. तर सुल तानपूर ग्रा.पं. सरपंच पद हे मागासवर्गीय महिलेसाठी राखीव  असल्याने अनेक उमेदवार बाशिंग बांधून होते. सरपंच पदासाठी  कलावती रोडू अवचार, चंद्रकला नथ्थू अवचार, लक्ष्मीबाई  शिवाजी अवचार, छाया कचरू पनाड, माला साहेबराव  वानखेडे या पाच उमेदवारात चुरस असलीतरी, प्रचाराच्या  शेवटच्या टप्प्यात चंद्रकला नथ्थु अवचार व छाया कचरू पनाड  यांच्यात सरळ लढत होऊन चंद्रकला नथ्थू अवचार यांनी  २,४७३ मते मिळवित १,३५६ मताने दणदणीत विजय  मिळविला. तर याच आघाडीचे १३ सदस्य विजयी झाले असून,  माजी महिला व बालकल्याण सभापती आशा झोरे यांच्या समृद्धी  ग्रामविकास आघाडीला ४ सदस्य संख्येवर समाधान मानावे  लागले. सदर निवडणुकीत सुलतानपूर नगर विकास आघाडीने  सरपंच पदासह स्पष्ट बहुमत प्राप्त केले. या विजयाचे श्रेय आघाडीचे डॉ. हेमराज लाहोटी, वामनराव झोरे  व मो. जमीर शे. हनीफ, अ. बशारत अ. सत्तार, मनोहर भाना पुरे, विजय खोब्रागडे तथा शे. आशकभाई यांना जाते.

विकास आघाडी पॅनलचा विजयवडगाव तेजन: ग्रामपंचायत निवडणुकीत कृउबास सभापती शिव  पाटील तेजनकर यांच्या विकास आघाडी पॅनलचा बहुमताने  विजय झाला. तर लोणार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका  अध्यक्ष सदानंद पाटील तेजनकर यांच्या जनशक्ती ग्रामविकास  आघाडीला हार पत्करावी लागली. सरपंचासह १0 पैकी ९  उमेदवार विजयी झाले. तर सरपंच पदासाठी शिव पाटील  तेजनकर यांच्या पत्नी वर्षा शिवशंकर तेजनकर हय़ा बहुमताने  विजयी झाल्या. तर विकास आघाडीचे सुरेश जाधव, गजानन  आनंदराव, भागवत सिरसाट, मंजुळा मुरलीधर सवडतकर, कस् तुरा नारायण मानवतकर, पुष्पा प्रदीप तेजनकर, सरिता गजानन  जाधव व संतोष पवार हे विजयी झाले. तर जनशक्ती विकास  आघाडीचे एकमेव उमेदवार मंगल विनोद तेजनकर हय़ा विजयी  झाल्या आहेत.