शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्याच्या शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:13 IST

Buldhana News दोन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देही संपूर्ण घटना सिसीटीव्हीत कैद झाली आहे. बेडशीट व टॉवेलच्या सहाय्याने आत्महत्या केली. एकाने यापूर्वी बालसुधारगृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

बुलडाणा: येथील बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान ही संपूर्ण घटना सिसीटीव्हीत कैद झाली आहे. नेमक्या कोणत्या कारणांनी या दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केली ही बाब स्पष्ट झालेली नाही.शेगाव येथील एका चोरीच्या प्रकरणात हे दोन्ही विधी संघर्ष बालक बुलडाणा शहरातील शासकीय मुलांचे निरीक्षण/बालगृहामध्ये होते. पाच डिसेंबर रोजी सकाळी त्यांनी बेडशीट व टॉवेलच्या सहाय्याने आत्महत्या केली.  सकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले जाते. दोन्ही विधी संघर्ष बालक हे सेगाव येथील चोरीच्या प्रकरणात बुलडाणा बालसुधारगृहात १५ दिवसापूर्वीच आले होते. यातील एका मुलाची आई ही एनडीपीएसच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याचे वडील गतीमंद असल्याची माहिती समोर येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, एसडीपीअेा रमेश बरकते, बुलडाणा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप साळुंके यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यासोबतच बाल न्यायमंडळाचे न्यायाधिश यांच्यासह बाल कल्याण समिती सदस्य, जिल्हा सत्र न्यायाधिश यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सध्या पोलिस घटनास्थळी पंचनामा करत असून मृत मुलांचे पार्थिव शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या दोघांपैकी एकाने यापूर्वी बालसुधारगृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वीही येथील बालसुधारगृहात काही दिवस तो होता, असे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSuicideआत्महत्या