पळशी सुपो ( जि. बुलडाणा) : शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३0 मे रोजी रात्री येथे घडली. येथील शेतकरी पुत्र योगेश पूर्णाजी राऊत (वय ३0) या युवकाने ३0 मे रोजी रात्रीदरम्यान राहत्या घरात दोरी व रुमालाचे साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री १२ वाजता ही घटना उघडकीस आली. याबाबतची माहिती वडील पूर्णाजी राऊत यांनी पोलीस पाटील शंकर फाळके यांना दिल्यानंतर त्यांनी जळगाव जामोद पो.स्टे.ला कळविले. याप्रकरणी जळगाव जा. पोलिसांनी कलम १७४ जाफौनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कर्जबाजारीपणा, वडील कर्जबाजारी तसेच हलाखीची परिस्थितीला कंटाळून योगेश पूर्णाजी राऊत यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची माहिती मृतकाच्या नातेवाइकांनी दिली. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.
गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Updated: June 1, 2015 02:02 IST