लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रमः शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना हिवरा बु.येथे शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. हिवरा बु. येथील अरविंद सुदाम बोरे (५०) यांनी गावालगत गोठ्याजवळ गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्यावर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक चे कर्ज असून त्यांच्या पश्च्यात आई, बहीण, भाऊ, पत्नी, दोन मुले असा आप्त परीवार आहे. प्रशांत बोरे यांच्या माहीतीवरुन पुढील तपास साखरखेर्डा पोलीस अधिकारी करीत असून आत्महत्येचे कारण वृत्त लिहीपर्यत्न कळू शकले नाही.