शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटासाठी गेलेल्या नातेवाइकांना बेदम मारहाण

By admin | Updated: January 28, 2016 23:25 IST

ग्रामस्थांनी मध्यस्थी करीत सोडविले; जखमींना रुग्णालयात दाखल केले.

धामणगाव धाड (जि. बुलडाणा) : येथील एक कुटुंब जळगाव खान्देश येथे घटस्फोट घेण्यासाठी गेले असता मुलीकडील मंडळींनी गाडी अडवून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती अशी की, धामणगाव (धाड) येथील विष्णूपंत पायघन यांचा मुलगा पवन याचा विवाह जळगाव येथील ज्ञानेश्‍वर फुसे यांचे मुलीशी झाला होता; परंतु दोघांतील मतभेदामुळे घटस्फोट घेण्याचे ठरले होते, त्यानुषंगाने मुलीला साडेदहा लाख रुपये देण्याचे ठरले. पैकी पाच लाख अगोदर आणि उर्वरित साडेपाच लाख बुधवारी दिल्याचे मुलाचे मामा महेंद्र बेराड यांनी सांगितले. बुधवारी घटस्फोटाचे कामकाज आटोपून पायघन कुटुंबीय परतीच्या मार्गाने गावाकडे येत असताना जळगाव-अजिंठा महामार्गावर चिंचोली गावानजीक मुलीचा भाऊ विकी फुसे यांच्यासह पंधरा जणांनी गाडी अडवून बेदम मारहाण केली. ग्रामस्थांनी मध्यस्थी करीत सोडविले. जखमींना रुग्णालयात दाखल केले.