शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

चांडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा असाही बेजबाबदारपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST

पंचायत समिती सभापती उषाताई चाटे यांच्यासह पंचायत समिती सदस्यांचा या भागात पाहणी दौरा होता. यावेळी त्यांनी उपसरपंच ...

पंचायत समिती सभापती उषाताई चाटे यांच्यासह पंचायत समिती सदस्यांचा या भागात पाहणी दौरा होता. यावेळी त्यांनी उपसरपंच निर्मलाबाई देशमुख यांच्यासह आपल्या पदाधिकारी समवेत भेट दिली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराबाबत उपसरपंच निर्मलाताई देशमुख यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली. तसेच इतरही अनेक पदे रिक्त असल्याने स्थानिक व विदर्भ परिसरातील २१ गावे सामील असून, मराठवाड्यातीलसुद्धा बहुसंख्य नागरिक येथे उपचारासाठी येतात. परंतु, भर दिवसा आरोग्य केंद्रात कर्मचारी उपस्थित नसल्याने रात्रीची परिस्थिती काय असेल याचा विचार न केलेलाच बरा, अशी संतप्त प्रतिक्रिया सभापती व सदस्य आणि उपसरपंच यांनी व्यक्त केली. त्यामुळे चांडोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी असल्याची अवस्था निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असतात. परंतु, ज्याठिकाणी आरोग्य यंत्रणाच आजारी असेल तेथे रुग्णसेवेची अपेक्षा ठेवणे कठीण झाले आहे.

पालकमंत्र्यांकडे केली तक्रार

आजारी यंत्रणेवरच रुग्णसेवेची भिस्त असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची हेळसांड होताना दिसत आहे. त्यामुळे उपसरपंच निर्मलाबाई देशमुख यांनी आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे या गंभीर बाबीची तक्रार केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही. प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोनाली आने सध्या म्हस्ला येथे कार्यरत आहेत. तसेच चांडोळ येथील सहा उपकेंद्र व २१ गावांचा भार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर अवलंबून आहे.

एकही कर्मचारी राहत नाही मुख्यालयी

कोणतेच कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचीही माहिती समोर आली आहे. म्हणजेच रात्री-अपरात्रीच्या वेळेस स्थानिक अथवा परिसरातून जर प्रसूतीसाठी महिला रुग्ण आल्यास डॉक्टरअभावी त्या रुग्णास रेफरशिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. रुग्णांना रात्री-अपरात्री सेवा देण्यासाठी कोणतेही जबाबदार अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने केवळ आरोग्य सेविकेच्या भरवशावर रुग्णालयाची जबाबदारी थोपवतात. याठिकाणी प्रसूतीबरोबरच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासुद्धा केल्या जातात. परंतु, यासाठी रुग्णालयात जबाबदार कायमस्वरूपी अधिकारीअभावी रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे.

प्रा. आरोग्य केंद्रात कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. तसेच रात्री एखादे इमर्जन्सी रुग्ण आल्यास कोणतेच जबाबदार अधिकारी किंवा डॉक्टर नसल्याने रुग्णांची हेळसांड होते. त्यामुळे या गंभीर समस्येकडे आरोग्य विभागातील वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करावे.

- निर्मलाबाई देशमुख, उपसरपंच चांडोळ.

प्रा. आ. केंद्रात गेले असता केवळ दोनच कर्मचारी उपस्थित होते. इतर अधिकारी व कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे या गंभीर बाबीची वरिष्ठांना माहिती देण्यात आली. तसेच लवकर या बाबतीत गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

- उषा चाटे, पं. स. सभापती बुलडाणा.