शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हगणदरी मुक्ततेसाठी खामगावला सबुरीचा सल्ला!

By admin | Updated: May 19, 2017 19:55 IST

खामगाव शहराची जिल्हा स्तरीय समितीकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत हगणदरी मुक्ततेसाठी खामगाव शहराला आता प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येते. खामगाव नगर पालिकेने हगणदरी मुक्त शहरासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव सादर केल्यानंतर शुक्रवारी जिल्हा स्तरीय समितीमार्फत शहराची पाहणी करण्यात आली. यावेळी समितीने काही बाबींबर असमाधान व्यक्त केल्याचे समजते.

स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत खामगाव नगर पालिकेने शहर हगणदरीमुक्तीचा ठराव घेतला. या ठरावानुसार हगणदरी मुक्त शहर म्हणून पात्र ठरण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला. या प्रस्तावानुसार शुक्रवारी जिल्हा प्रशासन अधिकारी उदय कुरवलकर यांच्या नेतृत्वातील पथकाने शहराची पाहणी केली. या पाहणीत समितीने अनेक बाबींवर समाधान तर, काही बाबींवर असमाधान व्यक्त केले. त्याचवेळी खामगाव नगर पालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीत उल्पावधीत केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचे कौतुकही जिल्हा स्तरीय समितीच्यावतीने करण्यात आले. या समितीमध्ये जिल्हा प्रशासन अधिकारी उदय कुरवलकर, खामगावचे उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, तहसीलदार सुनील पाटील यांचा सहभाग होता. यावेळी खामगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्यासह आरोग्य पर्यवेक्षिका पल्लवी इंगळे, आरोग्य निरिक्षक अनंत निळे, सुनील राजपूत, नागेश रोठे यांच्यासह खामगाव पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकातील सदस्यांची उपस्थिती आहे.या भागात झाली पाहणी!शहरातील उघड्यावर हगणदरी असलेल्या काही भागांची पाहणी केली. यामध्ये बाळापूर फैल, शंकर नगर, चांदमारी, माखरिया मैदान, हरिफैल आदी भागाचा समावेश होता. चिखली रोडवर देखील पथकाने भेट दिली.

हगणदरी मुक्तीसाठी सामुहिक प्रयत्नांची गरज!स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीसोबतच उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, शहरातील नागरिकांकडून या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. सामाजिक संस्थांचाही स्वच्छ महाराष्ट्र अभियानात अपेक्षीत प्रतिसाद नसल्याची वस्तुस्थिती असून, राजकीय पदाधिकाऱ्यांकडून या अभियानाकडे कानाडोळा केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ आणि हगणदरी मुक्त करण्यासाठी राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाल्याची चर्चा होत आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीत खामगाव पालिकेची प्रगती दिसून येत आहे. मात्र, अद्यापही काही बाबींवर पालिकेला लक्ष देण्याची गरज आहे. -उदय कुरवलकर, जिल्हा प्रशासन अधिकारी, बुलडाणा.