शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उपसरपंचाला लाच घेताना पकडले

By admin | Updated: December 17, 2015 02:38 IST

लोणार तालुक्यातील घटना; विहिरीचा मंजूर आदेश देण्यासाठी मागितली होती लाच.

लोणार : रोहयो योजनेतून मंजूर झालेल्या विहिरीचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी शेतकर्‍याकडून दोन हजार रुपयांची लाच घेणारा आरडव येथील उपसरपंच कचरू महादू सानपसह ग्रामपंचायत सदस्याचा पती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. रोहयोमधील विहिरींच्या बांधकामासाठी तीन लाख रुपयांचे अनुदान मंजूर झालेल्या आरडव येथील स्वप्निल बबन मोरे या तरुण शेतकर्‍याकडून तीन महिन्यांपूर्वी आरडवचे उपसरपंच कचरू महादू सानप तसेच ग्रामपंचायत सदस्याचे पती सुदाम दगडू मोरे यांनी २0 हजार रुपये घेतल्यानंतरही शेतकर्‍यास विहिरीचा कार्यारंभ आदेश देण्यास टाळाटाळ केली. उपसरपंचाने स्वप्निल बबन मोरे या शेतकर्‍यास पुन्हा दोन हजारांची मागणी केली. पैशाच्या या मागणीमुळे त्रस्त झालेल्या स्वप्निलने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास पाटील यांनी सापळा रचून बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास तहसील कार्यालयावर स्वप्निल मोरे यांच्याकडून कार्यारंभ आदेशासाठी दोन हजारांची लाच घेणारा आरडव येथील उपसरपंच कचरू सानप आणि सुदाम मोरे यांना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विलास पाटील, सतीश ढोकणे, विजय वाकडे, संजय शेळके, प्रदीप गडाख, श्याम भांगे आणि सुखदेव ढाकरे हे कारवाईत सहभागी होते.