शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार डेंग्यूचे डास ओळखण्याचे प्रशिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:49 IST

सर्वत्र संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी,  नाले व पाण्याचे डबके  साचल्याने त्यामध्ये   मोठय़ा प्रमाणात  डासांची निर्मिती होऊन अनेक रुग्ण तापेने फणफणत आहे त.   त्यामुळे आपला परिसर डेंग्यू डासमुक्त राहण्यासाठी  विद्यार्थ्यांना डेंग्यू डास ओळखण्याची माहिती जिल्हा हिवताप  कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा हिवताप कार्यालयाचा उपक्रम विविध ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  सर्वत्र संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी,  नाले व पाण्याचे डबके  साचल्याने त्यामध्ये   मोठय़ा प्रमाणात  डासांची निर्मिती होऊन अनेक रुग्ण तापेने फणफणत आहे त.   त्यामुळे आपला परिसर डेंग्यू डासमुक्त राहण्यासाठी  विद्यार्थ्यांना डेंग्यू डास ओळखण्याची माहिती जिल्हा हिवताप  कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात यावर्षी मागील आठ दिवसांपासून संततधार  पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी वाढली आहे.  त्यामुळे  डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती झाली. त्यामुळे  ग्रामीण भागासह शहर परिसरात तापेचे रुग्ण वाढले असून,  जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात तापेच्या  रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात डेंग्यूचा रुग्ण असल्याचा  संशय व्यक्त होत आहे.  या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय कीटकजन्य  रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा हिवताप  कार्यालयाच्यावतीने जिल्हा हिवताप अधिकारी एस.बी.  चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू डास ओळखण्यासाठी  माहिती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले  आहे. या कार्यक्रमांतर्गत  बुलडाण्यात ५ सप्टेंबर रोजी  आरोग्य सहायक, ७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेमध्ये  आरोग्य सहायिका, तसेच १५ सप्टेंबर रोजी वैद्यकीय  अधिकार्‍यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत डेंग्यू  डास कसा ओळखावा, डेंग्यू डासाची उत्पत्ती होऊ नये  म्हणून करावयाची उपाययोजना तसेच आरोग्याची काळजी  कशी घ्यावी, याबाबत नागरिकांना कशा प्रकारे माहिती  द्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

रोहणा व खामगाव येथे आज शिक्षकांची कार्यशाळाविद्यार्थ्यांनी डेंग्यूचा डास ओळखून आपला परिसरात स्वच्छ  व भयमुक्त कसा करावा, याबाबत त्यांचे शिक्षक चांगले  मार्गदर्शन करू शकतात. यासाठी प्रथम डेंग्यू डासाबाबत  शिक्षकांना माहिती देण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११  वाजता रोहणा व २ वाजता खामगाव येथे जिल्हा परिषद  शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या  कार्यशाळेत जिल्हा हिवताप अधिकारी एस.बी. चव्हाण  मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेनंतर शिक्षक आपल्या  शाळेतील विद्यार्थ्यांना डेंग्यू डास ओळखण्याची माहिती  देणार आहेत.