शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव तालुक्यात विद्यार्थ्यांना गणवेशासाठी मिळणार ३५ लाख

By admin | Updated: June 30, 2017 00:51 IST

यावर्षीपासून विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे!

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व नगर परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमधील ८७१५ लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी प्रती विद्यार्थी दोन गणवेशाकरिता ४०० रुपयांप्रमाणे ८७१५ विद्यार्थ्यांना ३४,८६,००० गणवेश रुपये अनुदान रक्कम देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांच्या पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश व मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यामध्ये वर्ग १ ते ८ मधील सर्व मुली ५५५३, एससी मुले १६१९, एसटी मुले १६८ व बीपीएल मुले १३७५, असे एकूण ८७१५ विद्यार्थ्यांना ३४,८६,००० गणवेश रुपये अनुदान रक्कम देण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांची आढावा सभा घेऊन गणवेश खरेदीबाबत मार्गदर्शन केलेले असून, गणवेश खरेदीबाबत अटी व शर्तीच्या लेखी स्वरूपात सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत या सत्रापासून गणवेश योजनेचे अनुदान डीबीटी धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. शेगाव तालुका अंतर्गत एकूण लाभार्थी संख्या ८७१५ असून, जिल्हा कार्यालयाकडे ३४,८६,००० रुपये गणवेश अनुदानाची मागणी केली आहे. तालुका स्तरावर सदर योजनेसाठी पात्र असलेल्या जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्यात येईल व त्यानंतर मुख्याध्यापक हे पालकांनी आपल्या पाल्यासाठी दोन गणवेश खरेदी करून, त्याची पावती मुख्याध्यापकांकडे जमा केल्यानंतर मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांच्या खात्यात सदर पावतीनुसार रक्कम वर्ग करतील.तसेच सर्व शिक्षा अभियान मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी विभागीय पाठ्यपुस्तक मंडळ अमरावती यांच्याकडून मागणीनुसार मराठी माध्यमाचे १३८१९, इंग्रजी माध्यमाची ७५३ व उर्दू माध्यमाची २८७१ एवढी पाठ्यपुस्तके शेगाव तालुक्यात शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप करण्यात आली आहेत.शेगाव तालुक्यांतर्गत एकूण नऊ केंद्र असून, त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा ७६, नगर परिषदेच्या १४ व खासगी अनुदानित २० अशा एकूण ११० शाळांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ सन १७-१८ या शैक्षणिक वर्षात देण्यात आला. त्यात ग्रामीण भागातील आठ केंद्रातील शाळांना पाठ्यपुस्तके पोहच केली. उर्वरित नगर परिषद क्षेत्रातील पाठ्यपुस्तकांचे वितरण २७ जून रोजी झाले.