शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

मोफत सवलत पाससाठी विद्यार्थ्यांची झुंबड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 18:56 IST

बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुका म्हणून खामगाव तालुक्याची नोंद झाली आहे.

खामगाव :  बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुका म्हणून खामगाव तालुक्याची नोंद झाली आहे. त्यामुळे खामगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत सवलत पासचा लाभ देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) घेतला. त्यानुसार मोफत सवलत पाससाठी विद्यार्थ्यांची बसस्थानकावर गर्दी होत आहे. गुरूवारी विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याने, चार विद्यार्थ्यांना भोवळ आली. विद्यार्थ्यांची वाढती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी बस स्थानकावर पाचारण करण्यात आले.खामगाव तालुक्यातील विविध खेड्यातील सुमारे ५ हजार विद्यार्थी सवलत पासच्या आधारे शिक्षणासाठी खामगाव येथे प्रवास करतात. या विद्यार्थ्यांच्या मासिक सवलत पासची मुदत दिवाळीत संपली.  दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे खामगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरूवारी मोफत पासेससाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली. मोफत पासचा  शेवटचा दिवस असल्याच्या गैरसमजातून गुरूवारी बस स्थानकात विद्यार्थ्यांची तुफान गर्दी झाली. काही विद्यार्थी पहाटेपासूनच रांगेत लागले. वाढत्या गर्दीमुळे श्वास कोंडल्या गेल्याने, चार विद्यार्थ्यांना बस स्थानकात भोवळ आली. ही बाब राजकीय पदाधिकाऱ्यांना समजताच, शिवसेनेचे प्रा. अनिल अंमलकार,    जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाबा काळे, विद्यार्थी नेते नितेश खरात यांनी बसस्थानकावर भेट दिली. प्रा. अनिल अंमलकर यांनी स्थानक प्रमुख योगेश वांदे यांच्यासोबत चर्चा केली.पासेससाठी अतिरिक्त खिडक्या!विद्यार्थ्यांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुरूवारी बस स्थानकात दोन अतिरिक्त खिडक्या उघडण्यात आल्या. विद्यार्थींनीसाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, गर्दीवर नियत्रंण मिळविण्यासाठी गुरूवारी पोलिसांना पाचारण करण्यात आले.सुटीच्या दिवशीही सुरू राहणार खिडकी!शुक्रवारी आणि रविवारी सुटीच्या दिवशीही मोफत सवलत पासची खिडकी सुरू राहील. मोफत सवलत पास तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांना दिली जाईल. यासाठी चार जणांची हंगामी ड्युटी देखील लावण्यात आली आहे.मोफत सवलतीचा लाभ तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दिला जाणार आहे. सर्वच विद्यार्थ्यांच्या पासेस एकाचवेळी संपल्यामुळे गुरूवारी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. मात्र, एसटी प्रशासनाकडून सर्वांना तात्काळ  वाढीव सुविधा व्यवस्था करण्यात आली. तशा सूचनाही स्थानकप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.- आर.आर. फुलपगारेआगार व्यवस्थापक, खामगाव.------------------कोणत्याही विद्यार्थ्यांला भोवळ आल्याचे निर्दशनात नाही. विद्यार्थ्यांनी गैरसमज वाढविल्याने बसस्थानकात गर्दी वाढली. अतिरिक्त कर्मचारी लावून पासेस दिल्या जाताहेत. सुटीच्या दिवशीही पासेस दिल्या जातील.- योगेश वांदेस्थानक प्रमुख, खामगाव.