शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकावर विद्यार्थ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:23 IST

शेलगाव देशमुख : अनेक वेळा निवेदन देऊनही विद्यार्थ्यांना  न्याय मिळत नसल्याने २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजतापासून  १0.३0 वाजतापर्यंत विद्यार्थी व पालकांनी शेलगाव देशमुख बस  स्थानकावर डोणगाव व विश्‍वीकडून येणार्‍या बस थांबवून बस  रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देडोणगाव व विश्‍वीकडून येणार्‍या बस थांबवून केले आंदोलनबससेवा सुरळीत करण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कशेलगाव देशमुख : अनेक वेळा निवेदन देऊनही विद्यार्थ्यांना  न्याय मिळत नसल्याने २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजतापासून  १0.३0 वाजतापर्यंत विद्यार्थी व पालकांनी शेलगाव देशमुख बस  स्थानकावर डोणगाव व विश्‍वीकडून येणार्‍या बस थांबवून बस  रोको आंदोलन केले.शेलगाव देशमुख, कनका बु. व विश्‍वी येथून दररोज जवळपास  १५0 विद्यार्थी शाळा, महाविद्यालयामध्ये येणे-जाणे करतात.   त्याचबरोबर परिसरातील नागरिकांना बँक, दवाखाना व इतर  महत्त्वाच्या कामासाठी दररोज प्रवास करावा लागतो. शेलगाव  देशमुख येथील विद्यार्थी व पालकांनी अनेक वेळा मेहकर  आगारप्रमुख यांना रात्री मुक्काम व दुपारी १२.३0 ला विद्या र्थ्यांच्या सोयीसाठी बससेवा सुरु करण्याची मागणी केली; परंतु  आगारप्रमुख या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान होत होते. या आगार प्रमुखाच्या गलथान  कारभाराला कंटाळून शेलगाव देशमुख येथील विद्यार्थी व  पालकांनी मंगळवारी बससेवा बंद पाडली.  यावेळी विद्यार्थी व  पालक यांनी जोपर्यंत मेहकर आगारप्रमुख लेखी देत नाहीत, तो पर्यंत बस सोडणार नाही, असा आग्रह धरला. शेवटी पोलीस  प्रशासनाने आगार प्रमुखास फोन करून घटनास्थळावर  बोलावले. मेहकर आगारप्रमुख जुमडे व डोणगाव पोलिस  स्टेशनचे ठाणेदार आकाश शिंदे हे घटनास्थळी येवून विद्यार्थी व  पालक यांचे म्हणणे प्रत्यक्ष लेखी घेऊन त्यांना यानंतर दररोज  बससेवा वेळेवर सोडण्यात येईल व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होणार नाही आणि चालक व वाहक यांना सुद्धा  चांगल्या वागणुकीच्या सुचना देण्यात येतील, असे लेखी  आश्‍वासन दिल्यानंतर बससेवा सुरळीत करण्यात आली.