शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेला उशिरा येणा-या विद्यार्थ्यांच्या नोंदी!

By admin | Updated: March 9, 2017 01:50 IST

पेपर व्हॉट्स अँपवर व्हायरल झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कडक उपाययोजना.

गिरीश राऊत खामगाव, दि. ८- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्‍या १२ वीच्या परीक्षेदरम्यान मुंबई, अमरावती व पुणे विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत पेपरच्या दिवशी सकाळी ११.00 पूर्वी प्रश्नपत्रिका व्हॉट्स अँपच्या माध्यमातून व्हायरल झाल्याच्या प्रकाराची शिक्षण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच यापुढे असे प्रकार होऊ नये, याची खबरदारी घेत पेपरला उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने नऊ विभागीय मंडळांमार्फत १२ वीच्या परीक्षेस २८ फेब्रुवारीपासून, तर १0 वीच्या परीक्षेस ७ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. १२ वीची परीक्षा २५ मार्च, तर १0 वीची परीक्षा १ एप्रिल या कालावधीत होत आहे. १२ वीच्या परीक्षेदरम्यान मुंबई, अमरावती व पुणे विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत पे परच्या दिवशी सकाळी ११.00 वाजतापूर्वी प्रश्नपत्रिका व्हॉटस अँपच्या माध्यमातून मोबाइलद्वारे परीक्षा केंद्राबाहेर गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकाराची शिक्षण मंडळाने गंभीरतेने दखल घेत या प्रकाराची शहानिशा विभागीय मंडळामार्फत सुरू करण्यात आली असून, त्यासाठी सायबर सेल व पोलीस खात्याकडे तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. यासाठी १२ वीच्या पुढील परीक्षेसाठी व १0 वीच्या संपूर्ण परीक्षेसाठी उपाययोजना करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश शिक्षण मंडळाकडून संबंधितांना देण्यात आले आहेत. राज्य मंडळामार्फत यापूर्वी ८ ऑक्टोबर २0१५ रोजी पाठविण्यात आलेले परिपत्रक व २८ फेब्रुवारी १७ रोजीचे पत्र यामध्ये सुचित केल्याप्रमाणे परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व परीरक्षक यांच्या व्यतिरिक्त अन्य घटक, विद्यार्थी यांच्याकडे परीक्षा कालावधीत भ्रमणध्वनी (मोबाइल), टॅबलेट तत्सम साधने इंटरनेट इत्यादी सुविधा प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. असे असताना उपरोक्तप्रमाणे घटना घडणे ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. तरी याबाबत तातडीने योग्य नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करून त्याचा अहवाल वेळोवेळी राज्य मंडळास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित वेळेपूर्वी व विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता प्रश्नपत्रिकांची पाकिटे उघडली जाणार नाहीत, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी व याबाबत सुचित करण्यात यावे व त्यांची योग्य अंमलबजावणी करून घ्यावी. यासाठी परीरक्षक केंद्रावर प्रत्येक केंद्रासाठी एक याप्रमाणे स्वतंत्र सहायक परीरक्षक नेमण्यात यावा. या सहायक परीरक्षकासोबत प्रचलित पद्धती प्रमाणे संबंधित परीक्षा केंद्राच्या सीलबंद प्रश्नपत्रिका पाठविण्यात याव्यात. या सहायक परीरक्षकाने प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर दिल्यापासून उत्तरपत्रिका जमा करून परीरक्षक केंद्राकडे येईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचे पूर्ण वेळ परीक्षा केंद्रावर थांबून निरीक्षण व नियंत्रण करावे. अशी ठेवली जाणार करडी नजरपरीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका हस्तांतरित केल्यानंतर निर्धारित वेळेत व विहित पद्धतीने प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे उघडण्याच्या व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरित करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर सहायक परीरक्षकाने प्रत्यक्ष नियंत्रण करावे.